मुख्य बातम्या

पत्रकार रायकर यांच्या निधनामुळे आरोग्य गैरकारभार चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

0

पुणे :सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या टीव्ही ९ मराठीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन करोना विषाणूची बाधा झाल्याने झालेले आहे. मात्र, त्याचवेळी त्यांना सलग तीन दिवसात ऑक्सिजनसहित बेड किंवा रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांचे मित्र व नातेवाईक यांचे म्हणणे आहे. याचीच दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.याबाबद्दल टीव्ही ९ मराठी यांनी याबाबत विभागीय चौकशी दिल्याची ब्रेकिंग न्यूज प्रसिद्ध केली आहे. त्यावर नगरमधील पत्रकार राजेंद्र त्रिमुखे यांनी म्हटले आहे की, आमचा नगरचा पांडुरंग गेला..ई टीव्ही,एबीपी सोबत काम केलेले आणि tv9 चे पुण्याचे विद्यमान रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचे कोरोनाने दुःखद निधन.. पुण्यासारख्या ठिकाणी दोन दिवस ऑक्सिजनबेड, व्हेंटिलेटर मिळाले नाही, कार्डियाक ऍम्ब्युलन्स मिळाली नाही.. पत्रकारांची ही अवस्था तर सामान्यांचे काय?? आता सरकार चौकशीचे आदेश दिलेत.. शेम.. शेम!!एकूणच राज्यासह देशभरात सगळे काही उत्तम असल्याचे भासवले जात आहे. केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारी यंत्रणांनी आपल्याच पद्धतीने स्वत:ला क्लीनचीट दिलेली आहे. अशावेळी पत्रकार रायकर यांच्या निधनाने पत्रकारिता जगात आणि सरकारी यंत्रणांना मोठा धक्का बसला आहे. एका जबाबदार पत्रकाराला जर योग्य आरोग्य सुविधा मिळत नसेल तर महाराष्ट्रातील सामान्य जनतेची काय वाईट परिस्थिती असेल असाच प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यावर अशा साठे पाटील यांनी त्रिमुखे यांच्या पोस्टवर अहमदनगर शहरातील वाईट परिस्थिती लिहिली आहे. त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, नगरमधेही भितीचे वातावरण आहे जनतेमधे.अफवा आहे कि नाही हे माहीत नाही पन व्हेंटीलेटर अभावी पेशंटचा म्रुत्यु होत आहे अस बोललं जातयं…खर काय खोट काय देव जाणो.पन भितीमधे जगतोय प्रत्येक नागरीक….संपादन : सचिन पाटीललॉकडाऊनमध्ये मिळाला बुस्ट; सेवाभाव जपत ‘लोकरंग’वाल्यांनी जिंकला नगरकरांचा विश्वासAmazon वर सेल; 70 टक्क्यापर्यंत सूट, पहा फॅशनचा जलवाझालाय शेतकरी हिताचा ‘सर्वोच्च’ निर्णय; पहा SC यांनी काय दिलेत सरकारला निर्देशफ़क़्त १६ वर्षांमध्ये ‘या’ कंपनीने दिला बम्पर मनी; १० हजारांचे झाले २१ लाख रुपयेTrending : झुकेर्बर्गला घाम फोडणारी ती सिनेटर होती हॉटेलमध्ये वेट्रेस; होय, वाचा तिची प्रेरणादायी स्टोरी

एका चित्रपटासाठी ६ ते ८ कोटी रुपये एवढे मानधन घेणाऱ्या सुशांतने ‘दिल बेचारा’साठी या कारणामुळे घेतले होते फक्त एवढे मानधन !

Previous article

धक्कादायक : चीनमधून आली आणखी एक बेक्कार बातमी; पहा काय म्हटलेय पेंटागॉनने

Next article

You may also like

Comments

Comments are closed.