Royal politicsमहाराष्ट्रमुख्य बातम्या

संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या साठेंचे ‘पुरंदरे’चं मार्गदर्शक : जितेंद्र आव्हाड

0

टीम महाराष्ट्र देशा- सर्व शिक्षा अभियानातील ‘समर्थ श्री रामदास स्वामी’या पुस्तकात संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त उल्लेख केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘संभाजी राजा हा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता’ असा वादग्रस्त उल्लेख केल्याचे समोर आले आहे. संभाजी ब्रिगेडने या पुस्तकावर आक्षेप घेतला आहे.तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान,या पुस्तकाच्या लेखिका आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा एक फोटो राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केला आहे. ह्या फोटो मुळे जास्त शोध कार्य करण्याची गरज नाही साठे किंवा जेम्स लेन ह्यांचे मार्गदर्शक एकच ‘पुरंदरे’असल्याचं म्हटलं आहे. शुभा साठे यांनी समर्थ रामदास स्वामी या पुस्तकात शिवछत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी केली आहे. त्यांचे हे वादग्रस्त पुस्तक महाराष्ट्र सरकारने सर्वशिक्षा अभियानातून मागे घ्यावं; व शुभा साठे यांच्यावर गुन्हा दाखल करावा … साठे यांनीही महाराष्ट्राची माफी मागावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.

Loading...

‘समर्थ श्री रामदास स्वामी’ हे पुस्तक डॉ. शुभा साठे यांनी लिहिले असून त्याचे प्रकाशन नागपूरमधील लाखे प्रकाशनाने केले आहे. सर्व शिक्षा अभियानात समाविष्ट असणाऱ्या या पुस्तकातील पान क्रमांक १८ वर संभाजी महाराजांविषयी उल्लेख आहे. ‘रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या- खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले’, असा उल्लेख या पुस्तकात आहे.

सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात कुठलाही पुरावा नसताना छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आली, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. हा निव्वळ करंटेपणा असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. असा भयंकर मजकूर शालेय प्राथमिक पुस्तकात छापला जातो हे राज्य सरकारचे दुर्दैव आहे, असेही ब्रिगेडने म्हटले आहे.

संभाजी महाराजांचा वादग्रस्त उल्लेख,‘सर्व शिक्षा अभियाना’चे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात

सत्ता, पैसा, धर्मस्थळ आणि सरकारी यंत्रणेचा भाजपकडून प्रचंड गैरवापर- सचिन सावंत

Loading...

या भेटीमागे दडलंय काय ? जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर

Previous article

मराठ्यांना ओबीसीमध्येच आरक्षण द्या : पुरुषोत्तम खेडेकर

Next article

You may also like

Comments

Comments are closed.