Royal Entertainmentमुख्य बातम्या

‘रिया चक्रवर्ती’ च नाही तर या प्रसिद्ध अभिनेत्रींनी खाल्लेली आहे जेलची हवा, 4 नंबर वालीचे नाव ऐकून धक्काच बसेल

0

सुशांतसिंग राजपूतचे प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत आहे. सुशांत मृ-त्यू प्रकरणात ड्र-गची बाजू समोर आल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक केली आहे.
रिया चक्रवर्ती हिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे पण बॉलिवूड इंडस्ट्रीतील तुरुंगवास भोगलेली अशी पहिली अभिनेत्री रिया चक्रवर्तीच नाही, कारण यापूर्वीही बॉलिवूडमधील अनेक नामांकित अभिनेत्री आहेत. त्या काही गुन्ह्याअंतर्गत तुरूंगात गेलेल्या आहेत. तर चला मग जाणून घेऊया या यादीमध्ये कोण कोणत्या अभिनेत्रींचा समावेश आहे.
मोनिका बेदी – आपल्याला चित्रपट अभिनेत्री मोनिका बेदी माहितच असेल, तिने बॉलिवूडच्या बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे, एवढेच नव्हे तर ती बिग बॉस 2 मध्येही सहभागी झाली होती. अभिनेत्री मोनिका बेदी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमची गर्लफ्रेंडदेखील राहिलेली आहे. 2002 मध्ये मोनिका बेदी हिला गॅंगस्टर अबू सालेमसह लिस्बन शहरातुन ताब्यात घेण्यात आले. बनावट कागदपत्रांमुळे मोनिका बेदी दोषी आढळल्यामुळे तिला 4 वर्षे तुरूंगात घालवावी लागली.
ममता कुलकर्णी – बॉलिवूड इंडस्ट्रीची सुप्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीला अ-मली पदार्थांच्या त-स्करीप्रकरणी तुरूंगात टाकले गेले होते.
पायल रोहतगी – अभिनेत्री आणि मॉडेल पायल रोहतगीला नेहरू-गांधी कुटुंबाविरूद्ध चुकीची भाषा व अ-श्लील भाष्य केल्याबद्दल अहमदाबादहून अटक करण्यात आली होती पण काही दिवसानंतर पायल रोहतगीची जामिनावर सुटली झाली होती.
सोनाली बेंद्रे – धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली सोनाली बेंद्रे यांना तुरुंगात जावे लागले होते. वास्तविक, प्रकरण असे होते की सोनाली बेंद्रेने एका मासिकाच्या मुखपृष्ठासाठी फोटोशूट केले होते. या चित्राच्या आत, सोनाली बेंद्रेने एक लहान पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता, ज्यावर ॐ आणि नमः शिवाय असे लिहिलेले होते, आणि त्यामुळे तिच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता.
प्रेरणा अरोरा – प्रेरणा अरोरा अक्षय कुमारच्या “पॅडमॅन”, “टॉयलेट एक प्रेम कथा” आणि “रुस्तॉम” या चित्रपटाची निर्माती आहे, पण तिलाही तुरुंगवास भोगावा लागला होता. वास्तविक, तिच्यावर कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप होता, ज्यामुळे तिला सुमारे 8 महिने तुरूंगावास भोगावा लागला.
अलका कौशल – 50 लाखांचा चेक बाऊन्सच्या प्रकरणात अलका कौशलला तुरूंगात जावे लागले होते. चेक बाऊन्स प्रकरणी अलका कौशलला 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. अभिनेत्री अलका कौशलने सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात करीना कपूरच्या आईची भूमिका केली होती. ‘क्वीन’ चित्रपटात तिने अभिनेत्री कंगना रनौतच्या आईची भूमिका देखील केली होती.
श्वेता बसू – फिल्म अभिनेत्री श्वेता बसूला ‘मकडी’ आणि ‘इकबाल’ सारख्या चित्रपटांमध्ये काम करण्याशिवाय दोन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. बातमीनुसार असे म्हणतात की वेश्याव्यवसायात तिचे नाव पुढे आल्यावर श्वेता बसूच्या चाहत्यांना धक्का बसला होता. तिला वेश्या व्यवसायात रंगेहाथ पकडले गेले, त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आणि सुधारगृहात पाठवले.
The post ‘रिया चक्रवर्ती’ च नाही तर या प्रसिद्ध अभिनेत्रींनी खाल्लेली आहे जेलची हवा, 4 नंबर वालीचे नाव ऐकून धक्काच बसेल appeared first on Home.

आपल्या सौंदर्या बाबतच्या वस्तू आहेत आपल्याच किचनमध्ये, हे 6 उपाय चेहऱ्यावरील डाग गायब करतील

Previous article

कपिल शर्माच्या बायकोपेक्षा सुंदर आहे, चंदू चायवल्याची बायको, पहा सुंदर फोटो

Next article

You may also like

Comments

Comments are closed.