मुख्य बातम्या

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल जयंत पाटील म्हणतात….

0

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक पार पडली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यावर स्पष्टीकरण देताना, खडसेंबाबत कोणतीही चर्चा न झाल्याचं सांगितलं.जयंत पाटील म्हणाले, “एकनाथ खडसे यांच्याविषयीची कोणतीही चर्चा आजच्या बैठकीत झाली नाही. राष्ट्रवादीच्या बैठकीत जळगाव जलसिंचन प्रकल्पाबाबत चर्चा झाली”.
एकनाथ खडसे यांच्या नाराजीबाबत ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाने विचार करावा, असा सल्ला जयंत पाटील यांनी भाजपला दिला. तसंच भविष्यात खडसे राष्ट्रवादीत येतील का, या प्रश्नावर जयंत पाटील यांनी, राजकारणात जर-तरला फार महत्व नसते, असं म्हणत उत्तर देणं टाळलं.
महत्वाच्या बातम्या :-

राजकीय खळबळ : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर?
शरद पवारांचा कृषी विधेयकाला विरोध नाहीच ; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
“राज्याच्या हितासाठी मोदी सरकारशी भांडायची वेळ येताच विरोधक कुठं जाऊन लपतात कळत नाही”
मला मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून कुणी थांबवू शकत नाही : संजय राऊत
महत्वाचे : राज्यातील हॉटेल सुरू करण्याबाबत आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल जयंत पाटील म्हणतात…. InShorts Marathi.

राजकीय खळबळ : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर?

Previous article

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संभाजीराजेंची मोदींकडे ‘ही’ मागणी

Next article

You may also like

Comments

Comments are closed.