Royal politicsमहाराष्ट्रमुख्य बातम्या

दोन समाजांमध्ये भाजप सवतासुभा तयार करतेय : जयंत पाटील

0

टीम महाराष्ट्र देशा- देशातील अल्पसंख्याक समाज आणि मागासवर्गीय समाज भाजपला मतदान करणार नाही हे लक्षात घेऊन या दोन समाजांमध्ये सवतासुभा निर्माण करण्याचे काम आता भाजपकडून सुरु झाले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी नवीमुंबई मध्ये कार्यकर्ता मेळाव्यात केला.

मुख्यमंत्र्यांनी नाणार जाणार की नाही हे पारदर्शीपणे सांगावे – जयंत पाटील

Loading...

प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि माजी मंत्री गणेश नाईक यांचा तीन दिवसाचा संयुक्तरित्या दौरा दिनांक ३ ते ५ ऑक्टोबरला पार पडला. या तीन दिवसाच्या दौऱ्यामध्ये पालघर,वसई,कल्याण आणि नवी मुंबईमध्ये कार्यकर्ता मेळावे पार पडले. या दौऱ्याची सांगता वाशीतील विष्णूदास भावे सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याने झाली.

गिरीश महाजन मंत्री आहेत की पक्षाचे खजिनदार ? :जयंत पाटील

पालघर, वसई-विरार, भाईंदर, अंबरनाथ, भिवंडी, ठाणे शहर, कल्याण आणि नवी मुंबई या ठिकाणी कार्यकर्ता मेळावे पार पडले. या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना पक्षवाढीसाठी मार्गदर्शन केलेच शिवाय कार्यकर्त्यांमध्ये जान फुंकण्याचे कामही केले.त्यांनी आपल्या भाषणामध्ये बुथ कमिट्या किती महत्त्वाच्या आहेत. या कमिटयांमुळे भविष्यात अनन्यसाधारण महत्व येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भेटवस्तू द्यायच्या असतील तर त्या निवडणुकीनंतर द्या : जयंत पाटील

मेळाव्यात माजी मंत्री गणेश नाईक यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना निवडणुका लवकरच येणार आहेत त्यामुळे कामाला लागा असा सल्ला देतानाच त्यांनी पंतप्रधान मोदींच्या कामांवर जोरदार टीकाही केली.

या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष आमदार संदीप नाईक, युवा नेते सागर नाईक, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, नवीमुंबईचे महापौर जयवंत सुतार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार, युवक अध्यक्ष सुरज पाटील आदींसह इतर पदाधिकारी, नगरसेवक मोठया संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्र्याची कमिटमेंट सरकारी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखीच – जयंत पाटील

Loading...

पुण्याच्या लोकसभेच्या जागेवरून कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये रंगला कलगीतुरा

Previous article

उदगिरात प्राध्यापकांचे आंदोलन, विद्यार्थ्यांनी दिला पाठिंबा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.