टॉप पोस्टराजकारण

मेहबूबा मुफ्तींचा राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द

0

भाजपने जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीचा (पिपल्स डेमोक्रेटिक पार्टी) पाठिंबा काढून घेतल्यानंतर जम्मू काश्मीर मधील सरकार अल्पमतात आले होते. त्यामुळे मुख्यंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. आता जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती लागवट लागू होणार की नव्याने निवडणूका होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

जर नव्याने निवडणूका झाल्या तर मोठ्या प्रमाणात हिसांचार होऊ शकतो असे राजकीय विश्लेणषकांचे मत आहे. सद्य स्थितीत जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीच्या 28, भाजपच्या 25, नॅशनल काॅन्फरंसच्या15, काॅंग्रेसच्या 12 व इतर 7 जागा आहेत.

Loading...

जम्मू काश्मीरमध्ये बहुमताचा आकडा 44 आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाला प्रादेशिक पक्षाला सोबत न घेता सत्ता स्थापन करणे अशक्य आहे. परंतू काॅग्रेसने स्पष्ट केले आहे की ते कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाहीत. त्यामुळे अशा परिस्थिती नव्याने निवडणूका होण्याची शक्यता अधिक आहे.

तसेच जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल काॅन्फरंसचे नेते ओमर अबदुल्ला यांनी देखील राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.

त्याआधी आज भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या निवासस्थानी जम्मू काश्मीरमधील भाजपच्या नेत्यांशी झालेल्या बैठकीत पीडीपी बरोबरची युती तोडण्याचा निर्णय घेण्यात आला.  ईदनंतर दहशतवादी विरोधी कारवाया चालू करण्यावर दोन्ही पक्षांमध्ये मतभेद होते.

2016 मध्ये भाजप व पीडीपीची सरकार बनले होते. भाजपने पाठिंबा काढल्याचे पत्र राज्यपालांना पाठवले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची देखील मागणी भाजपने केली आहे.

राम माधव यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. ते म्हणाले की, जम्मू काश्मीरमधील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. फ्रीडम आॅफ स्पिचचे पण स्वतंत्र्य राहिले नाहीये. काही दिवसापुर्वी झालेल्या शुजात बुखारी यांच्या हत्येनंतर हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.

ते म्हणाले की, जम्मू – काश्मीरमध्ये आम्हाला शांती पाहिजे, म्हणून केंद्र  सरकारकडून जम्मू-काश्मीरसाठी 80 हजार करोडचे पॅकेज देण्यात आले होते.

तसेच पक्ष अध्यक्ष अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे देखील त्यांनी नमूद केले.

 

Loading...

अखेर भाजप-पीडीपीचा काडीमोड, जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवटीची शक्यता

Previous article

सर्वात मोठी धावसंख्या, सर्वात मोठा विजय, सर्वात मोठा पराभव – एकाच मॅचमध्ये घडल्या अनेक गोष्टी

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *