Royal politicsटॉप पोस्ट

मोदी सरकार विरोधात अविश्वासदर्शक प्रस्ताव, आज काय काय झाल संसदेत हे नक्की वाचा

0

आज केंद्रातील मोदी सरकार विरोधात संसदेमध्ये 11 वाजता अविश्वासदर्शक प्रस्ताव मांडण्यात येण्यास सुरुवात झाली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यावर बुधवारी तेलगू देसम पार्टी आणि इतर विरोधी पक्षांकडून एकदम धडकेबाज बॅटिंगला सुरुवात करण्यात आली. आज लोकसभात टीडीपी चर्चेला सुरुवात केली.  तर राहुल गांधी आज संसदेत चांगलेच गाजले.

संसद सुरू झाल्यापासून काय काय झाला संसदेत हे थोडक्यात- 

Loading...

सकाळी 10.38-  कॉंग्रेसला अविश्वासदर्शक प्रस्तावावर आपले मत मांडायला 38 मिनिट एवढा कालावधी मिळाला आहे. यामुळे मालिकार्जुन खरगे यांनी कॉंग्रेसला बोलण्यासाठी कमी वेळ दिल्याचा प्रश्न उचलून धरला.


सकाळी 10. 45 – एनडीएमध्ये सहभागी असलेला सर्वात मोठा मित्र पक्ष शिवसेना आणि बिजू जनता दल यांनी अविश्वास दर्शक प्रस्तावात चर्चेवर आणि  मतदानवर  बहिष्कार टाकला.


सकाळी 11.10-  तेलगू देसम पार्टीच्या जयदेव गल्ला यांनी अविश्वासदर्शक प्रस्ताव मांडण्यास सुरुवात केली. आंध्रप्रदेश हा राष्ट्रीय मुद्दा आहे, मोदी सरकारने आंध्रप्रदेशला    वाईट वागणूक दिली.  मोदी सरकार नाकारते असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.


दुपारी 12. 12-  भाजप चे खासदार राकेश सिंह यांनी त्यांच्या भाषणात संगितले की, अविश्वास दर्शक प्रस्ताव आणण्याचे कोणतेही योग्य कारण नाही.  यात त्यांनी मोदी सरकारचा 4 वर्षाचा विकासाचा पढा वाचून दाखवला. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यातील विकासाचा देखील पढा वाचला.


दुपारी 1.05-  राहुल गांधीनी भाषणाला सुरुवात केली. ‘जुमल्या’मुळे मोदी अडचणीत आल्याचे सांगत  राहुल गांधी यांनी मोदींवर आरोप केले. मोदींनी 2 कोटी रोजगारचे आश्वासन पाळले नाही. राफेलविमानाच्या खरेदीचे प्रकरण मांडून निर्मला सितारामन यांनी देशाला  खोटी माहिती दिली.

राफेल विमानाप्रकरणी मी बोलत आहे. आणि मोदी मी बोलत असताना माझ्या नजरेशी नजर भिडू शकत नाहीयेत, पंतप्रधानांनी देशाला धोका दिला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.  या नंतर गोंधळ झाल्याने दुपारी 1.45 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले.


दुपारी 1.45-  सभापती सुमित्रा महाजन यांनी कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर सभागृहात आरोप करताना कोणाची ही नावे घेऊ नका, पुरावे नसताना कोणतेही आरोप करू नका असे संगितले.


दुपारी 2.00-   राहुल गांधीनी सभागृहात आक्रमक भाषण केले. त्यांचे लोकसभेतील आतापर्यंतचे सर्वात चांगले भाषण होते असे म्हटले तरी चालेल. राहुल गांधी भाषणात म्हणाले की, आप लोगों कें अंदर मेरे लिए नफरत है. आप मुझे पप्पू और बहुत गालियाँ देकर बुला सकते है. लेकीन मेरे दिल मे आपके लिए नफरत नही है, असे म्हणत राहुल गांधींनी भाषण भाषणाच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींजवळ जात चक्क मिठीच मारली.


दुपारी 3.25-   मुलायम सिंग यादव यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यात ते म्हणाले की आम्ही शेतकर्‍यांच्या समस्या, व्यापर्‍यांच्या अडचणी आणि बेरोजगार या तीन गोष्टींबाबतच्या समस्या सोडवण्याची विनंती केली होती. परंतू सरकारने काहीच केले नाही.  उत्तरप्रदेशमध्ये भाजपचेच सरकार आहे पण तिथे भाजपवालेच नाराज आहे. शेतकरी व्यापारी त्रस्त आहेत. 


दुपारी 4.30-  राजनाथ सिंह यांनी विरोधकांच्या आरोपाला आपल्या भाषणातून प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला. चार वर्षा पूर्वी भारताची अर्थव्यवस्था 9 व्या स्थानावर होती. आता ती 4 त्या स्थानावर आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणनिधीकडून सांगण्यात आले. जगातील गुंतवणूक दारांना भारत गुंतवणुकीसाठी आकर्षक ठरत आहे.


 

Loading...

पुण्यात 3 हजार कोटींच्या चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000 च्या नोटा जप्त

Previous article

मोदींनी बहुमत जिंकले; पण राहुल गांधींनी मने जिंकली

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *