Royal Entertainmentमुख्य बातम्या

तुमची रोग प्रतिकारकशक्ती मजबूत आहे की कमजोर? जाणून घ्या…

0

सध्याच्या करोना संकटकाळात ‘इम्युनिटी’अर्थात रोग प्रतिकारकशक्ती हा परवलीचा शब्द बनला आहे. छोट्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांची इम्युनिटी कशी वाढेल, याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. सोशल मीडियावर तर इम्युनिटी वाढविणाऱ्या पदार्थांची जंत्रीच पाहायला मिळेल. अशा परिस्थितीत आपली रोग प्रतिकारशक्ती काशी आहे? आपण करोनाचा मुकाबला करण्यासाठी मजबूत आहोत की कमजोर, हे जाणून घेणे गरजेचे आहे. 
आपली इम्यूनिटी व्हायरस, बॅक्टेरिया, फंगस सारख्या टॉक्सिन्सला लढा देते आणि आपल्याला सर्दी, खोकला यासारख्या व्हायरल संसर्गापासून दूर ठेवण्यास मदत करते. आपली इम्यूनिटी मजबूत असल्यास  फुफ्फुस, मूत्रपिंड, यकृत  संंक्रमण तसेच इतर आजरांपासून बचाव होतो.
इम्यूनिटी कमजोर असल्यास संक्रमणाचा धोका अधिक असतो, हे खरं आहे. आपल्या जवळपास अनेक प्रकाराचे संक्रामक तत्व किंवा एलर्जी निर्माण करणारे तत्व आपल्या आरोग्यासाठी नुकसान करणारे असतात. कळत-नकळत आपल्या आहारात सामील असतात. प्रदूषणामुळे श्वास घेताना देखील हवेतून हे नुकसान करणारे तत्व आपण आत घेतो, तरी आजाराला बळी पडत नाही. त्याचे कारण म्हणजे आपली इम्युनिटी सिस्टम मजबूत असणे.
या उलट ज्यांची प्रतिकारक शक्ती कमजोर असते त्यांना वातावरणात बदल, एलर्जी सहन होत नाही आणि अशा परिस्थितीत ते आजारी पडतात. तसं तर रक्त तपासणीद्वारे देखील इम्यूनिटीबद्दल कळू शकतं. मात्र इम्युनिटी सिस्टम कमजोर असल्यावर शरीर स्वत: संकेत देतं.
आपण वारंवार आजारी पडत असाल किंवा प्रतिकूल परिस्थितीत दुसर्‍यांपेक्षा लवकर आजरी पडत असाल तर आपली इम्यूनिटी कमजोर आहे, हे नक्की. वातावरणात, आहारात थोडे बदल झाल्यावर आपल्याला सर्दी-खोकला, घसा खराब होणे, थकवा जाणवणे, एखादी जखम लवकर न भरणे अशी लक्षणे आपली कमजोर इम्यूनिटी अधोरेखित करतात. 
कमजोर इम्युनिटी सिस्टममुळे शरीरावर डाग पडणे, हिरड्‍यांवर सूज, तोंड येणे, यूटीआय, अतिसार, किंवा झोप न येणे, डिप्रेशन, डार्क सर्कल अशी इतर लक्षणे दिसून येतात.
अशा परिस्थितीत स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे तसेच संतुलित आहारात घेऊन इम्यून सिस्टम मजबूत करण्याची गरज आहे. व्हिटॅमिन डी इम्यूनिटी मजबूत करतं. अनेक लोकांमध्ये याची कमतरता आढळून येते. आणि याचं सर्वात सोपं स्त्रोत आहे सूर्य प्रकाश. याप्रकारे आपली दिनचर्या आणि आहाराकडे लक्ष देऊन आपल्या तब्येतीची काळजी स्वत: घेणे आरोग्यासाठी केव्हाही उत्तम. 
The post तुमची रोग प्रतिकारकशक्ती मजबूत आहे की कमजोर? जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat.

वजन घटवायचंय? मग रात्रीच्या जेवणात ‘हे’ अजिबात खाऊ नका!

Previous article

तुमची रोग प्रतिकारकशक्ती मजबूत आहे की कमजोर? जाणून घ्या…

Next article

You may also like

Comments

Comments are closed.