मुख्य बातम्या

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता नमो कंट्रोल्ड ब्युरो झाला आहे का? काँग्रेसचा थेट सवाल

0

सुशांतसिंह प्रकरणातून बॉलिवूडचे ड्रग कनेक्शन उघड होताच एनसीबीने काही लोकांना अटक केली. आता बॉलिवूडमधील काही कलाकारांची चौकशी होत असताना या प्रकरणाशी संबंधित असलेल्या भारतीय जनता पार्टी-बॉलिवूड-सँडलवूड-गोवा ड्रग कनेक्शनची चौकशी एनसीबी का करत नाही, हा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आता ‘नमो कंट्रोल्ड ब्युरो’ झाला आहे का, असा संतप्त प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

Has the NCB become Namo Controlled Bureau? pic.twitter.com/aS5DbhV5Oc
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 24, 2020

एनसीबीच्या ड्रग कनेक्शन चौकशीतून कंगणा राणावत गायबच आहे. आपण ड्रग्ज घेत होतो असे तीने स्वतः कबुल केले आहे. कंगणाचा ड्रग घेतल्यासंदर्भातील व्हीडीओ हा पुरावा आहे, असे असताना तीची चौकशी का केली जात नाही. ही चौकशी सुरु असताना कंगणा मुंबईत येऊन काही दिवस राहून परत शिमल्याला गेली पण चौकशीसाठी एनसीबीने तीला का बोलावले नाही? एनसीबी कंगणावर मेहरबान आहे का? का कंगणा बॉलिवूडचा भाग नाही? एनसीबी व्हॉट्सअप चॅटवरून चौकशीसाठी बोलावत असेल तर कंगणाच्या व्हिडिओकडे डोळेझाक का ?अशी विचारणा सावंत यांनी केली आहे.
 
महत्वाच्या बातम्या :-
मोठी बातमी : NCBकडून समन्स स्वीकारण्यास रकुल प्रीतची टाळाटाळ
मुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला ; केली ‘ही’ मागणी
NCBच्या कामात ठाकरे सरकार हस्तक्षेप करतंय ; नवनीत राणांचा गंभीर आरोप
#बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन – ‘दारू मी निवडलेलं ड्रग होतं’ , पूजा भट्टचा धक्कादायक खुलासा
धक्कादायक : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन !
 
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता नमो कंट्रोल्ड ब्युरो झाला आहे का? काँग्रेसचा थेट सवाल InShorts Marathi.

सुशांतच्या मृत्यूचं कारण अखेर उघडलं ; समोर आला ‘हा’ नवा रिपोर्ट

Previous article

‘अति तिथे माती’ शिवसेनेचा अंत जवळ आलाय ; निलेश राणेंचा सेनेवर हल्लाबोल

Next article

You may also like

Comments

Comments are closed.