Royal politicsटॉप पोस्ट

महाराष्ट्रात दारूबंदी नाही? खुद राज्य सरकारचाच नकार, जाणून घ्या सविस्तर

0

अनेक दिवस निघून गेले तरी राज्यात दारूबंदी अजून काही लागू झाली नाही, महिलांकडून गावा गावात अनेक मोर्चे काढण्यात आले. परंतू सरकार संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी लागू करण्यास काही तयार दिसत नाही. याचा राज्याला मिळणार्‍या महसुलावर परिणाम होऊन राज्याला तोटा सहन करावा लागेल असे महाराष्ट्र सरकारचे म्हणणे आहे.

राज्याला दारू विक्रीतून तब्बल दरवर्षी 18 ते 20 हजार कोटीच्या आसपास महसूल मिळतो. हा महसूल सोडण्यास राज्य सरकार तयार नाही, त्यात जीएसटी लागू झाल्याने राज्याला महसुलची अत्यंत आवश्यकता आहे.  चंद्रपुरात दारूबंदी झाल्यावर सरकारला फक्त चंद्रपुरात 600 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.

Loading...

महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी विधान सभेत असे संगितले की, संपूर्ण राज्यात दारूबंदी करण्याचा सरकारचा विचार नाही. परंतू चंद्रपुर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू राहील.

दारूबंदी करण्यात आलेल्या या जिल्ह्यात कठोर अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी समिती नेमण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी बावनकुळे यांनी केली. चंद्रपुरात दारूबंदी असताना ते देखील तिथे दारू मिळते. इतर राज्यातून महाराष्ट्रात ही दारू आणून अवैधरित्या विकली जाते.

बिहारमध्ये दारूबंदी तर महाराष्ट्रात का नाही?

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 2015 मध्ये दारूबंदी लागू केली होती. या राज्यात दरवर्षी 1410 लीटर दारू विकली जात असे. या आधी 1977 मध्ये बिहार सरकारने  कर्पुरी ठाकुर मुख्यमंत्री असताना राज्यात दारूबंदी लागू केली होती. परंतू दीड वर्षाने सरकारला महसूल कमी झाल्याने हा निर्णय मागे घेण्यात आला होता.

काय सांगतो जागतिक आरोगी संघटनेचा अहवाल- 

भारतात 30% लोक मद्यपान  करतात. तर 4-13 % लोक रोज मद्यपान करतात. दारूच्या विक्रीत भारत 3 रा मोठा देश आहे. दारू पिऊन गाडी चालवल्याने देशात 20% मृत्यू रस्ते अपघाताने होतात. देशात 5 पट विदेशी दारूचा आणि 4 पट देशी दारूचा खप वाढला आहे. पर्यंत

गेल्या 3 वर्षात दारूविक्रीतून करण्यात आलेल्या कारवाया-  

गेल्या 3 वर्षात 90 कोटीची अवैध दारू पकडण्यात आली. तर या बाबत 21 हजार प्रकरणाची नोंद करण्यात आली. अवैध दारूच्या व्यवसायात तब्बल 25 हजार आरोपींना अटक करण्यात आली.

Loading...

फ्रांसला मागे टाकत भारत बनला जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था

Previous article

अबब! भारतातील या राज्यात मिळणार फक्त 5 रुपयात पोटभर जेवण

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *