Royal politicsटॉप पोस्ट

‘मोदी केअर’च आयुष्मान अडचणीत आहे काय? जाणून घ्या

0

अमेरिकेमध्ये ओबामांची महत्वकांशी योजना ‘ओबामा केअर’ झाली,  सत्तेत आल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी याला विरोध केला आणि ही योजना आता मागे देखील पडली. परंतू त्या नंतर ‘आयुष्मान’ नावाची ‘मोदी केअर’ ही योजना  6 महिन्यापूर्वी मोदी सरकारकडून जाहिर करण्यात आली होती.  परंतू ही योजना अजून लटकूनच राहिल्याचे सध्याचे चित्रा आहे. आणि याची अंमलबाजवणी अजूनही आशेवरच आहे.

या मोदी सरकारच्या कार्यकाळातील दुसरी मोठी योजना असलेल्या आयुष्मान योजनेची घोषणा येणार्‍या 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून करण्याचा मानस पंतप्रधान मोदींचा आहे. परंतू ही योजना विमा कंपन्या आणि रुग्णालय यांच्याशी अर्धवट राहिलेल्या कररांमुळे लटकली आहे. दक्षिण अमेरिकेच्या लोकसंख्येएवढे लोक या योजने मध्ये सामावून घेतली जाणार आहे. देशातील गरीब रुग्णांना वेगवेगळ्या आजारांवर मोफत उपचार उपलब्ध व्हावेत          म्हणून मोदींनी देशातील गरीबांना पाच लाखांचा विमा देण्याची घोषणा केली होती.

Loading...

काय असेल ‘आयुष्मान’ योजनेत ज्याने गरीबांना मिळेल आयुष्मान:-

आयुष्मान योजनेत देशातील 50 कोटी लोकांना आरोग्य विमा देण्याचा मोदी सरकारचा मानस आहे.  लोकसंख्येच्या 40%  गरीब दारिद्र्य रेषेखालील  लोकांना या आयुष्मान आरोग्य विमा कवचाचे संरक्षण मिळणार आहे.  या योजनेत सामावून घेतलेल्या गरीब कुटुंबांना वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत मिळतील. या साठी खासगी क्षेत्रातील विमा कंपन्यांचा आणि रुग्णालयांचा लाभ गरीबांना घेता येईल.

येणार्‍या 2019 च्या लोकसभा निवडणुकी साठी सरकार आता घई घईने ही योजना लाटण्याचा प्रयत्नात असल्याचे दिसत आहे. घोषणेला 5 महीने उलटून गेले तरीही या योजनेची कासवगती अजूनही वाढलेली नाही. या योजनेचा विस्तार पाहता फक्त सरकारी विमा कंपन्या आणि रुग्णालये ही योजना पूर्णत्वास नेऊ  शकत नाही. याची जाणीव असताना अजूनही कोणत्या खासगी विमा कंपन्या आणि रुग्णालये यात सहभागी होणार हे अजून ठरलेलेच नाही.

‘आयुष्मान’चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संगितले आहे की, योजनेत सहभागी करण्यात येणारे लाभार्थी निश्चित झाले आहे, त्यासाठी लागणारी आयटी व्यवस्था देखील तयार आहे. परंतू सहभागी होणारे खासगी आणि सरकारी रुग्णालये आणि विमा  कंपन्या अजून ठरल्या नाहीत.

या मुळे जर अजून गरीबांना यात योजनेत सहकार्य करणार्‍या खासगी, सरकारी रुग्णालये आणि विमा  कंपन्याच अजून ठरल्या नसतील तर आयुष्मान योजनेचे आयुष अडचणीत आले आहे काय असा प्रश्न सामान्यांना पडतो आहे. आणि येणार्‍या निवडणुकीसाठी या योजनेची अंमलबाजवणीसाठी घई केली जात असल्याचे देखील दिसत असल्याचे विरोधी पक्षांकडून आरोप केला जात आहे.

Loading...

निकाल दिल्ली सरकारच्या बाजूने लागला असे म्हणणे चुकीचे ठरेल- अरुण जेटली

Previous article

Fanney Khan trailer :- स्वतः मोहम्मद रफी बनू न शकलेल्या बापाला आपल्या मुलीला लता मंगेशकर बनवायचयं

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *