मुख्य बातम्या

भाजप संचालित कंगनाने उर्मिलाबद्दल हीन शब्द काढूनही भाजप गप्प का? काँग्रेसचा घणाघात

0

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत सुशांत सिंह राजपूत प्रकरण आणि महाराष्ट्र, मुंबई, मुंबई पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत आहे. कंगना बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन, नेपोटिझमवर सोशल मीडियाद्वारे भाष्य करत आहे. कंगनाने उर्मिला मातोंडकरवर निशाणा साधत सॉफ्ट पॉर्न स्टार असा उल्लेख केला होता.
त्याबाबत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी, कंगनाने उर्मिला मातोंडकर यांच्याबाबत वापरलेल्या हीन शब्दांचा जाहीर निषेध केला आहे. महाराष्ट्राची कन्या उर्मिला मातोंडकर यांना भाजप संचालित कंगनाने अत्यंत हीन शब्द काढूनही भाजप गप्प का ?असा सवालही सचिन सावंत यांनी केला आहे. 

Why not a single @BJP4Maharashtra leader hs condemned the reprehensible remarks of @KanganaTeam against our daughter of Maharashtra @UrmilaMatondkar ? Although Kangana is a voter of Bandra West constituency, she lies about voting for @ShivSena. Why @ShelarAshish is keeping mum?
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 18, 2020

कंगनाने उर्मिला मातोंडकर यांच्याबद्दल हीन शब्द वापरल्यानंतर महाराष्ट्र भाजपने साधा निषेधाचा एका शब्दही काढला नसल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलंय. मतदारयादीत तिचं नाव वांद्रे पश्चिम मतदारसंघात असतानाही शिवसेनेला मतदान केलं असल्याचं खोटं सांगते, असं असूनही आशिष शेलार गप्प का, असा सवालही सचिन सावंत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
फक्त रणबीर आणि रणवीरच कशाला आदित्य ठाकरेंचीही ड्रग्ज टेस्ट करा ? राणेंची खळबळजनक मागणी
मुंबईतील जमावबंदीच्या आदेशानंतर आदित्य ठाकरे म्हणतात, ‘हा आदेश मुंबईला नवा नाही
आता मूक मोर्चे नाही संघर्ष अटळच ; नितेश राणेंचा ठाकरे सरकारला कडक इशारा
कंगना प्रकरणावरून शरद पवारांनी शिवसेनेचे कान टोचले? राऊतही नरमले
दिशा सालीयानच्या पार्टीत आदित्य ठाकरे उपस्थित होते ; ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. भाजप संचालित कंगनाने उर्मिलाबद्दल हीन शब्द काढूनही भाजप गप्प का? काँग्रेसचा घणाघात InShorts Marathi.

मोठी बातमी : आदित्य ठाकरेंवर नाराज शिवसैनिकांचा आज मनसेत प्रवेश

Previous article

Corona Update : काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची बाधा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.