खेळटॉप पोस्ट

भारतासाठी क्रिकेट खेळायची इच्छा होती, आता भारताविरूध्द क्रिकेट खेळणार हा खेळाडू

0

भारताकडून क्रिकेट खेळण्याची इच्छा भारतातील अनेक जणांना आहे. अनेक जण भारताकडून क्रिकेट खेळण्याचे स्वप्न घेऊनच मोठी होतात.पण प्रत्येकाला भारताकडून क्रिकेट खेळायला मिळत नाही. ज्यांना मिळत नाही ते क्रिकेट खेळणं सोडून देतात. पण काही जण असे असतात, जे काहीही झाले तरीही क्रिकेट सोडत नाही.

सिमी सिंग, पंजाबच्या मोहालीमध्ये जन्मलेल्या या खेळाडूला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड. मोहाली जवळील चंदीगडमध्ये क्रिकेट ट्रेनिंग घेतली. चंदीगडकडून अंडर -14 आणि अंडर-17 सुध्दा खेळला. परंतू पुढे त्याला पुढील स्तरावार खेळण्याची संधी मिळाली नाही.

Loading...

सिमी सिंग हा युजवेंद्र चाहल, सिद्धार्थ कौल, मनप्रीत गोनी आणि गुरकीरत सिंह सारख्या अनेक क्रिकेटर बरोबर क्रिकेट खेळला आहे.

भारताकडून पुढील स्तरावर क्रिकेट खेळायला मिळाले नाही म्हणून 2005 साली शेवटी सिमी सिंगने मित्राच्या सांगण्यावरून थेट आयर्लंड काढले व आयर्लंडमध्ये जावून तो ओल्ड बेल्वेड्री क्रिकेट क्लबमध्ये भरती झाला. तिथून त्याने थेट आयर्लंडच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवले.

भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे त्याचे स्वप्न पुर्ण झाले नाही तरी, आयर्लंडकडून मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे स्वप्न नक्कीच पुर्ण झाले आहे.

आज आयर्लंड विरूध्द होणाऱ्या टी-20 मॅचमध्ये सिमी आयर्लंडकडून खेळणार आहे. अखेर आज 13 वर्षांनंतर शेवटी सिमीला भारताविरूध्द क्रिकेट खेळायला मिळणार आहे व त्याचे स्वप्ऩ पुर्ण होणार आहे.

सिमी सिंग 31 वर्षाचा असून त्याने मे 2017 मध्ये आयर्लंडकडून वनडे आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये पदार्पण केले होते. तर जून 2018 ला आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पदार्पण केले होते.

Loading...

‘झिंगाट’ गाणं पुन्हा एकदा आलय तुम्हाला वेड लावायला

Previous article

‘भारत महिलांसाठी जगातील सर्वात असुरक्षित देश’ थॉमसन रॉयटर्सचा अहवाल; राष्ट्रीय महिला आयोगा’ने फेटाळला

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ