खेळटॉप पोस्ट

FIFA WC 2018 – फिफा वर्ल्ड कप विषयी जाणून घ्या 15 मजेशीर फॅक्ट

0

या वर्षीचा फिफा वर्ल्ड कप हा रशियातील 11 शहरात खेळला जाणार असुन, हे फिफा वर्ल्ड कपचे 88 वे वर्ष आहे. 1930 पासून फिफा वर्ल्ड कपचे आयोजन केले जात असून पहिला फिफा वर्ल्ड कप हा उरूग्वे या देशात खेळला गेला होता व पहिल्या फिफा वर्ल्ड कपचा विजेता देखील यजमान संघ उरूग्वे हाच होता.

या वर्षीचा वर्ल्ड कप 14 जून ते 15 जुलै या दरम्यान खेळला जाणार अाहे. दर चार वर्षाने होणारा वर्ल्ड कप पाहण्यासाठी करोडो चाहते जमा होत असतात. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी फिफा  वर्ल्ड कप विषयीचे काही मजेशीर फॅक्ट घेऊन आलो आहोत. 

Loading...

1) 1966 च्या वर्ल्ड कपच्या वेळेस फिफा वर्ल्ड कपची ट्राॅफीच चोरीला गेली होती. वर्ल्ड कप सुरू होण्याच्या काही दिवस आधीच ही घटना घडली होता. चोरीला गेलेली ट्राॅफी ‘पिकल्स्’ नावाच्या कुत्र्याच्या मदतीने 7 दिवसानंतर सापडली. त्या वर्षीचे यजमान पद इंग्लडने भुषवले होते.

2)आज पर्य़ंत झालेल्या वर्ल्ड कपमध्ये मेक्सिको देशाला सर्वात जास्त 25 मॅचमध्ये हार स्विकारावी लागली आहे. तसेच मेक्सिकोने 14 मॅचमध्ये विजय मिळवला असुन 14 मॅच ड्राॅ झाल्या आहेत.

3)सगळ्यात जास्त स्कोर झालेली मॅच 1954 मध्ये आॅस्ट्रोलिया विरूध्द स्विर्झलॅंड यांच्यामध्ये खेळली गेली होती. या मॅचमध्ये तब्बल 12 गोल झाले होते. या मॅचमध्ये आॅस्ट्रोलियाने स्विर्झलॅंडचा 7-5 असा पराभव केला होता.

4)आज पर्यंत झालेल्या वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त वेळा युरोपीयन खंडातील देशांनी 11 वेळा तर साउथ अमेरिका खंडातील देशांनी 9 वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. साउथ अमेरिका ब्राजील देशाने सर्वात जास्त 5 वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे.  बाहेरच्या खंडातील एकाही देशाला आजपर्यंत एकदाही वर्ल्ड कप जिकंता आलेला नाही.

5)सर विवियन रिचर्डस हे एकमेव खेळाडू आहेत जे फुटबाॅल व क्रिकेट या दोन्ही खेळांच्या वर्ल्ड कपमध्ये खेळले आहेत. ते 1974 च्या फिफा वर्ल्ड कपमध्ये अॅन्टिगा संघाकडून खेळले आहेत.

6) आज पर्यंत झालेल्या वर्ल्ड कपमध्ये ज्या देशाने वर्ल्ड कप जिंकला आहे. त्या संघाचा कोच त्या देशाचाच नागरीक आहे.

7)मिरोस्लाव क्लोसे याने आजपर्यंत वर्ल्ड कपमध्ये सगळ्यात जास्त 24 मॅचमध्ये 16 गोल केले आहेत. तर  रोनाल्डो 19 मॅचमध्ये 15 गोल करत दुसऱ्या स्थानावर आहे.

8) हेलमट शोनने वर्ल्ड कपमध्ये  सर्वात जास्त सामन्यात कोचची भुमिका पार पाडली आहे. त्याने 25 सामन्यात कोचची भुमिका पार पाडली असुन तो सर्व सामन्यात जर्मनीचा कोच होता.

9) आज पर्यंतचा सर्वात जलद गोल हा 2002 च्या वर्ल्ड कपमध्ये करण्यात आला असुन, सामना सुरू झाल्यानंतर केवळ 11 सेंकदात हा गोल झाला होता. टर्की आणि साउथ कोरिया यांच्यामध्ये झालेल्या या मॅचमध्ये हकान सुकूर याने हा गोल केला होता..

10 )ब्राजील संघाला आजपर्यंत सगळ्यात जास्त 11 वेळा रेड कार्ड भेटले आहे. तर अर्जेंटिनाला 10 व उरूग्वेला 9 रेड कार्ड भेटले आहेत.

11) ब्राजील संघाचा माजी खेळाडू पेले हा गोल करणारा सर्वात तरूण खेळाडू असुन त्याने वयाच्या 17व्या वर्षी 1958 च्या वर्ल्ड कपमध्ये गोल केला होता.

12) जेर जिंझो या ब्राजीलच्या खेळाडूने मेक्सिको येथे झालेल्या 1970 च्या वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक मॅचमध्ये गोल केला आहे.

13) जगातील 50 पेक्षा अधिक लोकं फिफा वर्ल्ड कप बघतात. 2010 ला 320 करोड लोकांनी वर्ल्ड कप पाहिला होता.

14) रशियन स्ट्रायकर ओलेग सॅलेनको याने 1994 च्या वर्ल्ड कपमध्ये कॅमेरून संघाविरूध्द 5 गोल केले होते. हा आजपर्यंतचा एका मॅचमध्ये खेळाडू कडून करण्यात आलेले सर्वात जास्त गोल आहेत.

15)1950 च्या वल्ड कपमध्ये ब्राजील आणि उरूग्वे यांच्यामध्ये झालेल्या मॅचमध्ये 1,99,854 प्रेक्षक उपस्थित होते. हा आजपर्यंतचा रेकाॅर्ड आहे. तसेच 1930 च्या वल्ड कपमध्ये एका मॅचमध्ये केवळ 300 लोकं उपस्थित होते.

 

(PHOTO INPUT:- FACEBOOK/FIFA)

Loading...

आरएसएसच्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांच्यावरील आरोप निश्चित

Previous article

महाराष्ट्रातून गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडणारी संशयित व्यक्ती अटकेत ?

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ