मुख्य बातम्या

188 प्रवाशांना घेऊन जाणार्‍या अपघातग्रस्त विमानाचा पायलट ‘भारतीय’

0

जकार्ताहून 188 प्रवाश्यांना घेऊन जाणारे इंडोनेशियाचे लायन एअरवेजचे प्रवासी विमान अचानक कोसळल्यानंतर इंडोनेशिया शोध पथकाकडून विमानाचा शोध सुरू झाला. उड्डाण केल्याच्या 13 मिनिटांनंतर या विमानाशी संपर्क तुटला. हे विमान चालवणारा पायलट भारतीय असल्याचे समोर आले आहे.

बोईंग 737 मॅक्स विमानाचा 31 वर्षीय पायलट भव्य सुनेजा हा भारतीय असून तो दिल्लीच्या मयूर विहारचा रहिवासी आहे, 2011 तो पासून लायन एअरवेजमध्ये कार्यरत आहे, त्याला पुन्हा भारत यायचे होते, सुनेजा दिल्लीचा असल्याचे त्याला दिल्लीमध्येच पोस्टिंग हवी होती, त्यासाठी तो भारतीय लायसन्स मिळवण्याच्या प्रक्रियेची तयारी करीत होता.

भव्य सुनेजाला याचे होते पुन्हा भारतात – 

Loading...

भारतीय एअरलाईन्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सुनेजाविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, जुलै महिन्यात आम्ही त्याच्याशी बोललो होतो. बोईंग 737 मॅक्स विमानाचा पायलट असलेल्या सुनेजाचा आतापर्यंतचा प्रवास निर्दोष होता. त्याचा आतापर्यंतचा चांगला रेकॉर्ड पाहता आम्ही त्याला भारतीय एअरलाईन्समध्ये रुजू करून घेण्यास उत्सुक होतो.

भव्य सुनेजा आणि विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असतील अशी आम्ही प्रार्थना करत आहोत असे देखील हा अधिकारी म्हणाला.

लायन एअरवेजमध्ये कार्यरत होण्याआधी सुनेजा 2010 मध्ये एमिरात एअरलाईन्समध्ये ट्रेनी पायलट कार्यरत होता, त्याला 2009 मध्ये बेल एअर इंटरनॅशनलकडून पायलटचा परवाना मिळाला होता.

अपघातग्रस्त विमानाबद्दल सांगताना लायन एअरलाईन्सचे प्रमुख महंमद स्यायुगी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की विमानाचे काही अवशेष मिळाले आहे. बचावकार्यासाठी व्हेसल्स तसेच हेलिकॉप्टर समुद्रावरून गस्त घालत आहेत, अवशेष शोधण्यासाठी आम्ही अधिक खोलवर जाण्याचा प्रयत्न करत आहोत असे त्यांनी नमूद केले.

ब्लुमबर्ग या वेबसाइटने इंडोनेशियाच्या शोध पथकाशी केलेल्या संपर्कानंतर दिलेल्या वृत्तानुसार उड्डाणाच्या वेळी विमान 3000 फुट उंचीवर होते.

Loading...

‘मेक इन इंडिया’ एक रोजगार घोटाळा – सामना

Previous article

बांग्लादेशच्या माजी पहिल्या महिला पंतप्रधान झिया यांना 7 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *