टॉप पोस्टराजकारण

भारतातील 70 % वापरण्यायोग्य पाणी प्रदुषित, दर वर्षी 2 लाख लोकांचा मृत्यू

0

नीति आयोगाने ‘काॅंम्पोसाइट वाॅटर मॅनेजमेन्ट इंडेक्स’ नावाचा रिपोर्ट प्रकाशित केला असून, यामध्ये भारतातील 70 % वापरण्यायोग्य पाणी हे प्रदुषित असून, स्वच्छ पाणी न मिळाल्यामुळे दर वर्षी भारतात 2 लाख लोकांचा मृत्यू होत असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

हा रिपोर्ट चर्चेत का आहे ?

हा रिपोर्ट भारतासाठी एक धोक्याची घंटा आहे. रिपोर्टनुसार भारत हा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या दुष्काळाचा सामना करत असून, लाखो लोकांचे आयुष्य धोक्यात आहे.तसेच 60 करोड लोकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.  जर काही केले गेले नाहीतर 2030 मध्ये पिण्याच्या पाण्याची मागणी दुप्पट होऊ शकते. जर पाण्याचे संकट असेच चालू राहिले तर 2050 मध्ये भारताचा जीडीपी दर हा 6 % कमी होण्याची शक्यता आहे.

Loading...

122 देशांच्या ‘वाॅटर क्वाॅलिटी इंडेक्स’ यादीत भारत हा 120 व्या क्रमांकावर आहे. 75 % लोकांच्या घरामध्ये पिण्याचे पाणी पोहचत नाही. तर 84 % ग्रामीण भागातील घरे पाईप लाईनने जोडलेली नाहीत.

रिपोर्टनुसार 2030 मध्ये 40 % लोकांना पिण्याचे पाणी मिळणार नाही. तसेच नवी दिल्ली, बेंगलोर, हेद्राबाद या सारखी 21 शहरे ही 2020 पर्यंत भुजल विरहीत शहरे होतील.

या रिपोर्टची ‘ईशान्य भारत व हिमालयाकडील राज्य आणि बाकीचा राज्य’ या दोन वेगवेगळ्या गटात विभागणी करण्यात आली अाहे.  वेगवेगळ्या जलशास्त्रीय स्थिती जाणून घेण्यासाठी यांची विभागणी करण्यात आली आहे.

या यादीत गुजरातची स्थिती सर्वात चांगली असून, त्या खालोखाल मध्यप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा क्रमांक आहे. तर झारखंडचा क्रमांक सर्वात खालचा आहे.

ईशान्य भारतातील राज्यामध्ये त्रिपुराची स्थिती सर्वात चांगली असून, उत्तराखंड आणि झारखंडचा क्रमांक सर्वात खालचा आहे.

Loading...

अमित शाह संचालक पदी असलेल्या बँकेत बंद झालेल्या नोटांचा सर्वात जास्त भरणा- RTI

Previous article

सावधान! प्लॅस्टिक वापरालं तर होईल 5 हजार रुपये दंड, उद्यापासून अंमलबजावणी

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *