खेळभारतमुख्य बातम्या

भारतीय क्रिकेट टीमच्या खेळाडूंना जीवे मारण्याची धमकी

0

बीसीसीआयच्या कार्यालयीन ईमेल आयडीवर १६ ऑगस्टला भारतीय क्रिकेट टीमच्या खेळाडूंना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल प्राप्त झाला होता. भारतीय संघातील खेळाडूंच्या जिवाला धोका आहे. यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाची सुरक्षा वाढवण्यात आली.

दहशतवाद विरोधी पथका एटीएसकडून गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. भा. दं. वि. कलम ५०६ (२), ५०७ सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट १९३२ कलम ७ अन्वये गुन्हा एटीएसने दाखल केला आहे .

Loading...

मात्र, बीसीसीआयनं ही बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणात आता दहशतवाद विरोधी पथकानं एक युवकाला आसाममधून अटक केली आहे. दरम्यान या युवकाच्य़ा ई-मेलनंतर बीसीसीआयनं मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकानं जगिरोड पोलिसांच्या मदतीनं या युवकाचा शोध घेत त्याल अटक केली. या युवकाची सखोल चौकशी केल्यानंतर, त्याला मुंबईत पाठवण्यात येणार आहे. पोलिसांच्या चौकशीत या युवकानं हा मेल केवळ बीसीसीआयला पाठवण्यात आला होता, कोणत्याही क्रिकेटरला पाठवण्यात आला नव्हता, असे सांगितले आहे

Loading...

राज ठाकरे चौकशीला सामोरे जात आहेत ही खूप मोठी गोष्ट – संजय राऊत

Previous article

‘महाराष्ट्रातील जनता यांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही’

Next article

You may also like

Comments

Comments are closed.

More in खेळ