टॉप पोस्ट

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीला पाहिजे ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय – रिपोर्ट

0

हिरे व्यापारी व पंजाब नॅशनल बॅकेच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय घेण्याच्या तयारीत आहे. द इंडियन एक्सप्रेस नुसार ब्रिटिश वर्तमानपत्र फाइनेंशियल टाइम्सने रविवारी हा दावा केला आहे.  यामध्ये म्हटले आहे की, नीरव मोदी हा ब्रिटनमध्ये आला असून राजकीय छळ होत असल्याचा आरोप करत त्याने ब्रिटनमध्ये आश्रय मागितला आहे.

या विषयी विचारले असता ब्रिटनच्या गृह मंत्रालयाने खाजगी माहिती देण्यास नकार दिला.

Loading...

वृत्तानुसार न्यूज एजेंसी राॅयटर्सने या विषयी माहिती घेण्यासाठी नीरव मोदीशी संपर्क केला होता पण त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने नीरव मोदीला भारतात आणण्यासाठी कायदे तज्ञाचा सल्ला घेत आहे. परंतू अशाच एका प्रकरणात भारत सरकारला विजय माल्याला भारतात परत आणण्यास यश आलेले नाहीये.

पीएनबी घोटाळ्या प्रकरणी पोलिसांनी 25 लोकांवर आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये नीरव मोदी शिवाय त्याचा मामा मेहूल चोकसी, पीएनबीची माजी प्रमुख उषा अनंतासुब्रमण्यम बरोबर आणखी दोन कार्यकारी संचालकांचा समावेश आहे.

नीरव मोदीने लेटर आॅफ अंडरटेकिंगच्या मदतीने हाॅगकाॅगच्या पाच नकली कंपनीच्या मदतीने हा घोटाळा केला असल्याचे म्हटले जाते. हा 13 हजार कोटींचा घोटाळा असून . भारताच्या बॅंकिग क्षेत्रातील हा आजपर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा मानला जातो.

तसेच नीरव मोदी हा फेब्रुवारी महिन्यापासुन फरार आहे.

Loading...

TRAILER : हॉकी लेजेंड संदीप सिंगच्या आयुष्यावरील ‘सूरमा’चा ट्रेलर रिलीज

Previous article

गोरखपूर दुर्घटना प्रकरणातील डॉ. कफील खान यांच्या भावावर आज्ञातांकडून गोळीबार

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *