खेळटॉप पोस्ट

Women’s Asia Cup: भारताची श्रीलंकेवर 7 विकेट्सने मात

0

कुआलालुंपुर(मलेशिया):-

मलेशिया येथे सुरू असलेल्या महिला आशिया कप स्पर्धेत आज  भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात  भारतीय महिला संघाने 7 विकेट राखून सामना खिश्यात घातला.

Loading...

श्रीलंकेने दिलेल्या 108 धावांचा अगदी सहज पाठलागा करत भारतीय संघाने 18.5 ओव्हर मध्ये 110 धावा करून शानदार विजय मिळवला. यात वेदा कृष्णमूर्ती ने नाबाद 4 चौकरांसह 23 बॉलमध्ये 26 रन केले. या खेळीत अनुजा पाटीलने नाबाद 16 बॉल 19 रन अशी खेळी करून वेदा कृष्णमूर्ती चांगली साथ दिली. कर्णधार हरमनप्रीत कौरने सावकाश खेळ करत 2 चौकरांसह 25 बॉलमध्ये 24 रन केले. ती प्रबोदींनीच्या बॉलिंगवर  रणशिंगेकडे कॅच देत बाद झाली.

याआधी श्रीलंकेच्या संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेत 20 ओव्हरमध्ये 107 धावा करीत 7 विकेट गमवल्या. निपुणी हंसीका अवघे 2 रन करून बाद झाली.  हासिनी परेरा ने नाबाद राहत 4 चौकरांसह 43 बॉल मध्ये 46 रन करीत श्रीलंकेचा डाव सावरला. भारतीय संघाच्या एकता बिश्त ने 4 ओव्हर मध्ये 20 रन देत 2 विकेट घेतल्या. तर झुलन गोस्वामी, अनुजा पाटील आणि पुनम यादव ने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.

स्कोरबोर्ड –

भारतीय महिला संघ – 18.5 ओव्हर 110 धावा 3 विकेट (मिताली राज 24 धावा , वेदा कृष्णमूर्ती 26 धावा )

श्रीलंका महिला संघ – 20 ओव्हर 107 धावा 7 विकेट (हासिनी परेरा 43 बॉल 46 रन, एकता बिश्त 2 विकेट, अनुजा पाटील 1  विकेट, पुनम यादव 1 विकेट)

(PHOTO INPUT : TWITTER/BCCI WOMEN)

Loading...

ही खेळाडू ठरली टी-20 मध्ये 2000 धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू

Previous article

VIDEO: संघाचा कार्यक्रम सुरु होताच कॉंग्रेसकडून ट्विट करत संघावर आरोप

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ