खेळटॉप पोस्ट

Hockey Champions Trophy 2018: ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनाचा भारताने केला 2-1 ने पराभव

0

नेदरलॅंड येथे सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये आजच्या सामन्यात भारताने ऑलिम्पिक विजेत्या अर्जेटिनाचा 2-1 अशा पराभव करत विजयी अभियान सुरू ठेवले. या आधी भारताने कालच्या मॅचमध्ये प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 4-0 ने पराभव केला होता.

पहिल्या सत्रात अर्जेंटिनाने चांगला खेळ केला. त्यांना पेनल्टी काॅर्नर देखील मिळाला होता पण गोलकिपर श्रीजेशने गोल करण्याची संधी दिली नाही. पहिल्या सत्रात एकाही संघाला गोल करता आला नाही.

Loading...

मॅचमधील तिन्ही गोल हे दुसऱ्या सत्रात झाले. दुसरे सत्र सुरू होताच 17 व्या मिनिटाला भारताच्या हरमनप्रीतने गोल करत खाते उघडले. त्यांनतर 28 व्या मिनिटाला हरमनप्रीतच्या पासवर मनदीप सिंगने आणखी एक गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.

त्यांनतर अर्जेंटिनाने आक्रमक खेळ करत पुढच्याच मिनिटाला गोंजालो पेयाने गोल करत आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. हाफ टाईमपर्यंत भारताने 2-1 अशी आघाडी मिळवली होती.

पुढच्या दोन्ही सत्रात दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही व भारताने ऑलिम्पिक विजेत्या अर्जेटिनाचा 2-1ने पराभव केला.

भारताने सुरूवातीचे दोन्ही सामने जिकूंन लय कायम ठेवली असून त्यांचा तिसरा सामना वर्ल्ड रॅंकिगमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या बलाढ्या आॅस्ट्रोलियाशी 27 जूनला होणार आहे.

 

Loading...

महाराष्ट्र स्वच्छतेत देशात अव्वल परंतू पिंपरी-चिंचवड स्वच्छतेबाबत निष्कामी

Previous article

FIFA WC 2018 : इंग्लंडची पनामावर 6-1 ने मात, हॅरी केनची हॅट्रिक, इंग्लंड अंतिम-16 मध्ये

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ