Royal politicsटॉप पोस्टमुख्य बातम्या

SCO: शांघाय सहकार्य परिषदेमध्ये भारताचा ‘बीआरआय’ला विरोध

0

शांघाय सहकारी संघटनेच्या क्किंगडाओ येथे झालेल्या परिषदेत चीनचा महत्वकांशी प्रकल्प असलेल्या बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) ला भारताने विरोध  करीत पाठिंबा देण्यास नकार दिला आहे.

चीन पाकिस्तान इकनॉमिक करिडोर हा बीआरआय चा भाग असून तो पाकव्याप्त कश्मीर मधून जात असल्याने भारताने त्याला पहिल्यापासूनच विरोध केला आहे. देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमा आणि देशाच्या सार्वभौमत्वाचा सन्मान राखण्याची हमी बहुराष्ट्रीय प्रकल्पांनी द्यायला  हवी  असे विधान    नरेंद्र मोदी यांनी शांघाय सहकारी संघटनेच्या परिषदेत केले. बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्ह  ल विरोध दर्शवत चीन वर अप्रत्यक्ष टीका केली.

Loading...

चीनचा महत्वकांशी प्रकल्प असलेल्या बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्ह बाबतचे दस्तऐवज असलेली 17  पानी संयुक्त कागदपत्रे शांघाय सहकारी संघटनेच्या बैठकीत सादर करण्यात आली, परंतू या कनेक्टिव्हिटी प्रकल्पांना समर्थन असल्याचे कोणतेही आश्वासन नरेंद्र मोदींकडून देण्यात आले नाही.

या बैठकीच्या शेवटच्या दिवशी कजाकिस्तान, उजबेकिस्तान, किरगिझस्तान, ताजिकिस्तान, पाकिस्तान, रशिया  या बीआरआय ला पाठिंबा असल्याचे दर्शवले आहे.

2017 साली शांघाय सहकार संघटनेच्या राज्यपरिषद प्रमुखांच्या बैठकीत भारताला संघटनेचे संपूर्ण सदस्य म्हणून मान्यता देण्यात आली होती. मोदी यांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले की, “आपण  25 व्या एससीओ शिखर संमेलनासाठी एक ध्येय निश्चित केले पाहिजे. आपण एक समिती म्हणून एकत्र काम केले पाहिजे. भारत या परिषदेच्या यशस्वी परिणामासाठी पूर्ण सहकार्य करण्यास वचनबद्ध आहे. ”

(PHOTO INPUT:- FACEBOOK/NARENDRA MODI)

Loading...

जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत -भाजप खासदार

Previous article

TRAILER : हॉकी लेजेंड संदीप सिंगच्या आयुष्यावरील ‘सूरमा’चा ट्रेलर रिलीज

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *