Royal politicsटॉप पोस्ट

पाकिस्तानचे पंतप्रधान होऊ शकणारे इम्रान खान भारताबद्दल हा विचार करतात

0

इम्रान खान यांची पीटीआय पार्टी ही पाकिस्तानातील निवडणुकीत मोठी पार्टी म्हणून समोर येत आहे. यामुळे इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान होऊ शकतात असे मानले जात आहे. जर असे असेल तर या पुढे परराष्ट्र धोरण देखील बदलले जाईल.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कायमच विवादित नातं जगजाहीर असताना इम्रान खान पंतप्रधान झालास त्याचा भारत पाक संबंधांवर काय परिणाम होऊ शकतो हे ही पाहणे गरजेचे आहे.

इमरान खान यांनी भारतावर केलेले आरोप- 
Loading...

पाकिस्तानच्या निवडणूक प्रचारावेळी जम्मू काश्मीरमधील परिस्थिती आणि गुजरात मधील दंगल यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पाकिस्तान तहरिक ए इंसाफ(पीटीआय) पार्टीचे इम्रान खान यांनी आरोप केले होते.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर ते भारताची कटपुटळी असल्यासारखे काम करतात असा आरोप केला. भारताचा उद्देश पाकिस्तान आणि पाकिस्तान सैन्याला बदनाम करण्याचा आहे. आणि नवाज शरीफ यात भारताची कायमच मदत करत आले. यामुळे भारतीय सैन्य नेहमीच पाकिस्तान सैन्यावर हल्ला करत आल आहे. म्हणूनच भारतीय मीडियाला देखील नवाज शरीफ आवडतात. हे इम्रान खान यांनी केलेले आरोप पाकिस्तान मधील निवडणुकीच्या 1 दिवस आधीचे म्हणजे 25 जुलैचे आहे.

भारताकडून करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइक संबंधित देखील भारतावर आरोप केले होते. भारत एक छोटासा बॉम्बस्फोट झाला तरी कोणत्याही तपासणी आणि पुराव्याशिवाय भारताकडून पाकिस्तानने हा हल्ला केला असे सांगण्यात येते.

‘दोन्ही देशातील संबंध सुधारण्यावर भर देईल’-

2011 साली सीएनएन आयबीएन ला दिलेल्या एक मुलाखतीत इमरान खान म्हणाले की, ‘मी भारताचा तिरस्कार करतात मोठा झालो आहे पण कालानुरूप मी भारताबरोबर चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ज्याने दोन्ही देशाचा फायदा होईल. मी लाहोर मध्ये मोठा झालो, 1947 रोजी लाहोर मध्ये मोठे दंगे झाले, त्यात रक्तपात झाली आणि तिरस्कार वाढला. परंतू भारतात जेव्हा माझे जाणे येणे सुरू झाले तेव्हा मला तिथे प्रेम मिळाले, तिथे माझे मित्र झाले. आणि माझ्यातील भारताबद्दलचा तिरस्कार कमी कमी होत गेला. ‘ 

जसा जसा काळ गेला तसे तसे मला जाणीव झाली की , ‘भारत पाकिस्तान मध्ये अनेक साम्य आहे. आपला इतिहास सारखा आहे , आपली संस्कृती सारखी आहे. यामुळे दोन्ही देशातील संबंध सुधारले तर दोन्ही देशांना त्याचा फायदा होईल.  त्यावेळी इमरान खान यांनी सत्तेत आलो तर दोन्ही देशातील संबंध सुधारण्यावर भर देईल असे देखील संगितले होते. ‘

Loading...

पश्चिम बंगालचे नाव बदलून आता ‘बांग्ला’ होणार? ममता सरकारची प्रस्तावाला मंजुरी

Previous article

HEROES OF HOPE – जागतिक किर्तीचा रेमन मॅगसेसे अवार्ड दोन भारतीयांना, जाणून घ्या कोण आहेत ते

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *