Royal politicsटॉप पोस्ट

‘भारत महिलांसाठी जगातील सर्वात असुरक्षित देश’ थॉमसन रॉयटर्सचा अहवाल; राष्ट्रीय महिला आयोगा’ने फेटाळला

0

‘थॉमसन रॉयटर्स फाउंडेशन’ या अत्यंत मानक,प्रतिष्ठित आणि जगप्रसिद्ध संस्थेकडून जगातील महिला सुरक्षिततेबाबत एक सर्वेक्षण करण्यात आले होते. याचा अहवाल संस्थेकडून काल प्रकाशित करण्यात आला. ‘महिलांसाठी जगातील सर्वात असुरक्षित देश’ म्हणून या क्रमवारीत भारत सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे.

महिला समस्येबाबत 548 तज्ञांनी आरोग्यविषयक सहाय्य, आर्थिक संसाधने आणि भेदभाव, प्रथागत प्रथा, लैंगिक हिंसा, असहकारात्मक हिंसा आणि मानवी तस्करी यासह सहा विषयांवर आधारित महिलांना होणार्‍या जोखमी संबंधित प्रश्न विचारण्यात आले होते. या सर्वेक्षणात भारतातील 43 तज्ञांनी देखील सहभाग घेतला होता.

Loading...

‘राष्ट्रीय महिला आयोगा’ने (एनसीडब्ल्यू) फेटाळला हा अहवाल-

थॉमसन रॉयटर्स फाउंडेशनकडून देण्यात आलेल्या अहवालात महिलांसाठी जगातील सर्वात असुरक्षित देश भारत असल्याचे मत मांडण्यात आले आहे. हा अहवाल ‘राष्ट्रीय महिला आयोगा’कडून (एनसीडब्ल्यू) फेटाळण्यात आला आहे. या अहवालातील क्रमवारी नुसार जे देश भारताच्या नंतरच्या क्रमावर आहेत, त्या देशात महिलांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची देखील मुभा (परवानगी) नाही. मग असे असताना भारत या क्रमवारीत पहिला कसा असा प्रश्न व्यक्त करीत आयोगाने अहवालबाबत शंका उपस्थित केली आहे.

प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालाबाबत बोलताना राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा या म्हणल्या की, “या सर्वेक्षणात घेण्यात आलेले नमुने (सहभागी संख्या) अत्यंत कमी असून, ते संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही.”

त्या पुढे असे ही म्हणल्या की, “भारतातील समस्यांबाबत भारतातील स्त्रिया अत्यंत जागरुक आहेत. या सर्वेक्षणातील भारताचे पहिला क्रमांक अत्यंत अयोग्य आहे. या अहवालात जे देश भारताच्या नंतरच्या क्रमावर आहेत, त्या देशात महिलांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची देखील मुभा (परवानगी) नाही.”

अशी आहे क्रमवारी ज्यात भारत 1 ल्या स्थानावर आहे-

या अहवालात महिलांसाठी सर्वात असुरक्षित देश या क्रमवारीत भारत 1 ल्या स्थानावर, अफगाणिस्तान 2 र्‍या स्थानवर, सीरिया 3 र्‍या स्थावर आणि सोमालिया 4 थ्या स्थानावर तर सौदी अरेबिया 5 व्या स्थानावर असून पाकिस्तानात या सर्वेक्षणात 6 वे स्थान आहे.
जर या अहवालावर विश्वास ठेवला तर सतत युद्धजन्य परिस्थिती असलेल्या अफगाणिस्तान, सीरिया, सोमालिया आणि पाकिस्तान या देशांपेक्षा भारत महिलांसाठी अधिक असुरक्षित आहे.

त्याच फाऊंडेशनद्वारे 2011 मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार भारत 4 थ्या स्थानी होता. तर अफगाणिस्तान 1 ल्या स्थानी, कॉंगो 2 र्‍या स्थानी, पाकिस्तान 3 र्‍या स्थानी आणि सोमालिया 5 व्या स्थानी होते.

2018 च्या सर्वेक्षणातील पाहणीनुसार भारत या कारणांमुळे सर्वात धोकादायक मानला जातो-

स्त्रियांविरुद्ध लैंगिक हिंसा आणि छळाचा धोका, सांस्कृतिक, आदिवासी आणि पारंपारिक धोकादायक पद्धतींचा स्त्रियांना करावा लागणारा सामना आणि लैंगिक गुलामगिरी आणि कौटुंबिक गुलामगिरी, जबरदस्तीने मजुरी, मानवी तस्करीचा धोका या कारणांमुळे देशातील महिला असुरक्षित आहेत.

Loading...

‘झिंगाट’ गाणं पुन्हा एकदा आलय तुम्हाला वेड लावायला

Previous article

सुजात बुखारींच्या मारेकर्‍यांची ओळख पटली, पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या सहभागाची शक्यता

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *