मुख्य बातम्या

भारत बंद : शेतकरी संघटनांचे आज देशव्यापी आंदोलन !

0

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आज शेतकऱ्यांकडून देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी अखिल भारतीय किसान सभा व संलग्न शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे.
या आंदोलनात ३०हून अधिक शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. याशिवाय, सीटू, हिंद मजदूर सभा, नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आदी १० कामगार संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. या संघटनाही बंदमध्ये सहभागी होतील.
कृषी विधेयके राज्यसभेत मंजुरीला आल्यापासून उत्तर भारतात शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्ग रोखून धरले जात आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानेही केंद्राच्या धोरणांविरोधात काँग्रेसने पुढील दोन महिने जनआंदोलन करण्याचे ठरवले आहे. त्याअंतर्गत देशभर पत्रकार परिषदा घेऊन शेतकऱ्यांची बाजू मांडली जाईल. काँग्रेससह १५ विरोधी पक्षांनीही या शेती विधेयकांना विरोध केला असून राष्ट्रपतींना या विधेयकांवर स्वाक्षरी न करता ती परत पाठवण्याची विनंती केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-

अहमदनगरमध्ये राजकीय खळबळ ; सभापतीपदाच्या रिंगणातील भाजप नगरसेवकाचा राष्ट्रवादीत प्रवेश
पाच वर्षे सुडाचे बळी ठरलो पण आता सुडाचे राजकारण करणार नाही : धनंजय मुंडे
OBC आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास… ; OBC समाजाचा राज्य सरकारला इशारा
मुंबईची तुंबई झाल्यावर बोंबा मारणारे नागपूर,अहमदाबाद जलमय झाल्यावर गप्प का? सेनेचा खोचक सवाल
जंबो कोविंडसेंटरमधून बेपत्ता झालेल्या लेकीसाठी माऊलीचे आमरण उपोषण

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. भारत बंद : शेतकरी संघटनांचे आज देशव्यापी आंदोलन ! InShorts Marathi.

अहमदनगरमध्ये राजकीय खळबळ ; सभापतीपदाच्या रिंगणातील भाजप नगरसेवकाचा राष्ट्रवादीत प्रवेश

Previous article

1 ऑक्टोबरपासून मुंबईत प्रवेश महागणार ; टोलच्या दरात वाढ

Next article

You may also like

Comments

Comments are closed.