खेळटॉप पोस्ट

Women’s Asia Cup: मलेशिया 27 धावांवर आॅलआउट, भारताचा 142 धावांनी शानदार विजय

0

कुआलालुंपुर(मलेशिया):-

मलेशिया येथे सुरू असलेल्या महिला आशिया कप स्पर्धेत आज आपल्या पहिल्याच सामन्यात भारतीय महिला संघाने मलेशिया संघाला 27 धावांवर आॅलआउट करत 142 धावांनी विजय मिळवत स्पर्धेची धमाकेदार सुरूवात केली.

Loading...

भारताच्या 169 धावांचा पाठलाग करण्यास मैदानात उतरलेला मलेशिया संघ 13.4 ओव्हरमध्ये 27 धावांवर आॅलआउट झाला. मलेशियाचे सहा खेळाडू शुन्यावर बाद झाले व एकही खेळाडू दुहेरी आकडा देखील गाठू शकला नाही. भारतातर्फे पुजा वस्त्राकरने 3 ओव्हरमध्ये 6 रन देत 3 विकेट घेतल्या.  तसेच अनुजा पाटील व पुनम यादवने प्रत्येकी 2 विकेट घेत संघाला विजय मिळवून दिला.

त्याआधी भारताने टाॅस जिंकून प्रथम बॅटिंग करताना 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावत 169 धावा केल्या. भारताच्या डावाची सुरूवात खराब झाली.  तिसऱ्याच षटकात सलामीवीर स्मृती मंधानाला ८ धावांवर बाद झाली मात्र त्यानंतर आलेल्या मिताली राजने शानदार 69 चेंडूत 97 धावांची नाबाद खेळी करत डाव सावरला. कर्णधार हरमनप्रीत कौरने 32 धांवाची खेळी करत तिला साथ दिली.

या स्पर्धेत भारतीय महिला संघाचा पुढील सामना 4 जुनला थायलंडविरुद्ध आणि 6 जुनला बांगलादेशविरुद्ध होणार आहे.

स्कोरबोर्ड –

भारतीय महिला संघ – 20 ओव्हर 169 धावा 3 विकेट (मिताली राज 97 धावा , हरमनप्रीत कौर 32धावा)

मलेशिया महिला संघ – 13.4 ओव्हर 27 धावा 10 विकेट (पुजा वस्त्राकर 3 विकेट, अनुजा पाटील 2  विकेट, पुनम यादव 2 विकेट)

(PHOTO INPUT : FACEBOOK/BCCI WOMEN)

Loading...

भारतीय फुटबाॅल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने केले चाहत्यांना भावनिक आवाहन

Previous article

न्यूक्लियर क्षमता असलेल्या अग्नि -5 चे यशस्वी परीक्षण 

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ