टॉप पोस्ट

फ्रांसला मागे टाकत भारत बनला जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था

0

भारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे. वर्ल्ड बॅंकेने 2017 साठी केलेल्या रिपोर्ट मध्ये म्हटले आहे. 130 करोडची  लोकसंख्या असलेल्या भारत हा फ्रांसला मागे टाकत सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे.

टाईम्स आॅफ इंडियानुसार, फ्रांसच्या 2.582 ट्रिलियन डाॅलर जीडीपीच्या तुलनेत भारताचा जीडीपी हा 2.597 ट्रिलियन एवढा झाला आहे. रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, अनेक वेळा तिमाही घसरण सहन केल्यानंतर 2017 पासून देशाच्या आर्थिक विकासात वाढ झाली आहे.

Loading...

परंतू प्रति व्यक्ति उत्पन्नाच्या बाबतीत भारत अनेक पटीने फ्रांसच्या मागे आहे. 67 मिलियन लोकसंख्या असलेल्या फ्रांस या बाबतीत 20 पटीने भारताच्या पुढे आहे.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, नोटबंदी आणि जीएसटी लागू झाल्यानंतर मॅन्यूफॅक्चरिंग आणि लोकांच्या खरेदी क्षमतेत वाढ झाली असल्याने ही वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष (आईएमएफ) नुसार 2018-19 मध्ये भारताचा जीडीपी 7.4 % आहे आणि 2019 मध्ये यात वाढ होऊन 7.8 % होण्याची शक्यता आहे.

टाॅप अर्थव्यवस्थेच्या या यादीमध्ये अमेरिका पहिल्या स्थानावर अाहे. त्यानंतर चीन, जापान आणि जर्मनी हे देश आहे. या यादीमध्ये ब्रिटन पाचव्या स्थानावर आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, 2032 पर्यंत भारत जगातील तिसरा सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश बनू शकतो.

Loading...

मॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणुकीत पिछाडीवर; आंध्र आणि तेलंगणा मात्र सरस

Previous article

महाराष्ट्रात दारूबंदी नाही? खुद राज्य सरकारचाच नकार, जाणून घ्या सविस्तर

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *