खेळटॉप पोस्ट

Women’s Asia Cup: पाकिस्तानचा पराभव करत भारतीय महिला संघाचा फायनलमध्ये प्रवेश

0

कुआलालुंपुर(मलेशिया):-

एकता बिश्तची भेदक बाॅलिंग व स्म्रिती मंधना आणि हरमनप्रीतच्या अर्धशतकीय भागीदारीच्या जोरावर आज भारतीय महिला संघाने पाकिस्तान संघाचा 7 विकेट्सने पराभव करत आशिया कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला.

Loading...

पाकिस्तान संघाच्या 72 धावांचा पाठलाग करण्यास मैदानात उतरलेल्या भारतीय महिला संघाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर मिताली राज पहिल्याच ओव्हरमध्ये शुन्यावर बाद झाल्यानंतर खेळण्यासाठी आलेली दिप्ती शर्मा देखील पुढच्याच ओव्हरमध्ये शुन्यावर बाद झाली. त्या दोघींना पाकिस्तानच्या अनाम अमीनने बाद केले.

दिप्ती शर्मा बाद झाल्यानंतर खेळण्यासाठी आलेल्या कॅप्टन हरमनप्रीत कौरने सलामीवीर स्म्रिती मंधनाबरोबर 65 रन्सची संयमी भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. स्म्रिती मंधनाने 40 बाॅलमध्ये 38 रन्स केले तर कॅप्टन हरमनप्रीत कौरने 49 बाॅलमध्ये नाबाद 34 रन्स केले.कॅप्टन हरमनप्रीत कौर व सलामीवीर स्म्रिती मंधना यांच्या भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने 16.1ओव्हरमध्येच 3 विकेट्स गमावत 75 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

त्याआधी टाॅस जिकून प्रथम बॅटिंग करण्यास मैदानात आलेला पाकिस्तान संघ भारतीय बाॅलर समोर टिकू शकला नाही. पाकिस्तान संघाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावत मात्र 72 धावा केल्या . पाकिस्तानतर्फे सना मीरने 38 बाॅलमध्ये नाबाद 20 तर नाहीदा खानने 27 बाॅलमध्ये 18 रन्स केले.

भारतातर्फे एक्ता बिश्तने 4 ओव्हरमध्ये 14 रन देत 3 विकेट्स घेतल्या. तर शिखा पांडे, अनुजा पाटील, पुनम यादव आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

एक्ता बिश्तला प्लयेर आॅफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या विजयाबरोबरच भारतीय महिला संघाने आशिया कपच्या फायनलमध्ये 7 व्यांदा प्रवेश केला आहे. याआधी झालेल्या सर्व आशिया कपच्या फायनल मॅचमध्ये भारतीय महिला संघाचा विजय झाला आहे.

स्कोरबोर्ड

पाकिस्तान महिला संघ –  20 ओव्हर 7 विकेट 72 रन (सना मीर नाबाद 20, नाहीदा खान  18, एक्ता बिश्त  3 विकेट्स)

भारतीय महिला संघ – 16.1 ओव्हर 3 विकेट 75 रन (स्म्रिती मंधना  38, हरमनप्रीत कौर नाबाद 34)

(PHOTO INPUT : – FACEBOOK/INDIANCRICKETTEAM)

 

Loading...

WORLD OCEAN DAY : प्लॅस्टिक प्रदूषण रोखण्याचे आवाहन

Previous article

COLUMN: तू ही योगी, मी ही योगी

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ