Royal politicsटॉप पोस्ट

विरोधी पक्ष सक्षम नाही हेच भाजपचे यश

0

पुढील लोकसभा निवडणुका अवघ्या एक वर्षावर येऊन ठेपल्या आहेत. राजकीय वातावरण बघता त्या लवकर देखील होऊ शकतात. निवडणुका तोंडावर आल्या असताना विरोधी पक्षांचे असे शांत असणे आश्चर्यकारकच म्हणावे लागेल. खास करुन ४४ जागांसह सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेला काँग्रेस.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर चार वर्षात प्रथमच विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस अस्तित्वात असल्याचे दिसून आले. तेही केवळ सत्ता स्थापनेच्या लालसे पोटी. त्याआधी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस अस्तित्वात आहे की नाही हे सुध्दा जनतेला माहित पडत नव्हते. मोदी सरकारने चार वर्षात काँग्रेसला स्वतःहून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्याची संधी अनेक वेळा दिली. नोटबंदी, जीएसटीचे अचानक लागू करणे असेल किंवा पंतप्रधानांचे वारंवार होणारे विदेश दौरे असतील; पण काँग्रेसने संसद बंद ठेवण्याव्यतिरिक्त एकदाही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली नाही. याचाच अर्थ असा की, २०१४ च्या निवडणुकीत मिळालेल्या पराभवातून काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी काहीही बोध घेतलेला दिसत नाही. त्यांनी एकदाही जनसामान्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत नाही.

Loading...

राजकारणामध्ये वारंवार इतिहासाची पुर्नावृत्ती होत असते. जे आरोप विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर करत असतो, तेच आरोप विरोधी पक्षावर सत्तेत आल्यावर होत असतात. फरक फक्त एवढाच असतो की, कोणता विरोधी पक्ष ते आरोप जनतेला पटवून देतो. २०१४ मध्ये भाजपने जे आरोप काँग्रेसवर केले होते तेच आरोप भाजपवर करण्याची संधी काँग्रेसकडे अनेक वेळा चालून आली होती; पण काँग्रेसने एकदाही विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली नाही.

भ्रष्टाचाराचे आरोप 

2014 च्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार हा सर्वात मोठा मुद्दा ठरला होता.  रॅार्बट वाड्रा यांच्यावरील आरोप, 2 जी घोटाळा, कॅामनवेल्थ घोटाळा, कोळसा खाण वाटप घोटाळा असेल अशा अनेक घोटाळ्यांचे आरोप करत भाजपने जनतेत काँग्रेसची प्रतिमा पूर्णपणे मलिन केली होती व त्याचाच फायदा भाजपला निवडणुका जिंकण्यासाठी झाला.

तीच संधी काँग्रेसला देखील जय अमित शाह प्रकरण, पियुष गोयल प्रकरण तसेच राँफेल घोटाळा याद्वारे चालून आली होती; पण यामध्ये एकदाही काँग्रेसने सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली नाही. एवढेच काय तर, सामान्य लोंकापर्यंत देखील ते या घोटाळ्यांची माहिती पोहचवू शकले नाहीत.

निर्भया ते कठुआ-उणाव बलात्कार घटना

२०१२ मध्ये झालेल्या निर्भया घटनेनंतर संपूर्ण देशात त्या विरोधात निर्दशने झाली होती. खास करुन दिल्लीमध्ये. यामुळेच काँग्रेसच्या शिला दिक्षीत यांना दिल्लीमधील सत्ता गमवावी लागली होती. या वेळेस भाजपने काँग्रेस सरकार कसे कुचकामी आहे, ते महिलांच्या सुरक्षेबाबत किती अकार्यक्षम आहे हे लोकांना पटवून दिले होते.

२०१८ मध्ये देखील कठुआ आणि उणावच्या बलात्कार घटनांनी देश पुन्हा एकदा हदरला. एका घटनेत तर भाजपचाच आमदार आरोपी आहे. एवढे असतानाही काँग्रेसने दिल्लीमध्ये एक कॅन्डल मार्च व सोशल मीडियावर भाजप विरोधी कॅम्पेन चालवण्याव्यतिरिक्त काहीच केले नाही.

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ

२०१४ मध्ये जनतेने कॅाग्रेसला नाकारण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण म्हणजे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वारंवार होणारी वाढ. महागाईमुळे लोक त्रस्त झाली होती. त्यावेळी पेट्रोलची किंमत ७४ रुपये/लिटर तर डिझेलची किंमत ५५ रुपये/लिटर होती. आता त्याच पेट्रोलची किंमत ८५ रुपये/लिटर तर डिझेलची किंमत ७२ रुपये/लिटर झाली आहे. असे असताना देखील काँग्रेसने व कोणत्याही विरोधी पक्षाने कोठेही आंदोलन केले नाही की रस्त्यावर उतरुन लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला नाही.

अण्णा हजारे आंदोलन

२०१२ -१३ मध्ये अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार विरोधी देशव्यापी आंदोलन केले  होते.  भ्रष्टाचार विरोधी आंदोलनापेक्षा ते काँग्रेसविरोधी आंदोलनच अधिक होते. असे असले तरी या आंदोलनाला तरुणांच्या व देशातील जनतेच्या प्रतिसादाने काँग्रेस सरकार हादरुन गेले होते. याच आंदोलनाचा फायदा उठवत भाजपने काँग्रेसविरोधी मोहीम व्यापक स्तरावर पोहचवली होती.

याच अण्णा हजारे यांनी २०१८ मध्ये देखील लोकपालसाठी पुन्हा आंदोलन केले. पण लोकांचा अल्प प्रतिसाद पाहता केवळ 10 दिवसात ते आंदोलन मागे घेतले. या आंदोलनच्या वेळेस देखील काँग्रेस अदृश्य स्थितीच होती. काँग्रेसने एकदाही या आंदोलनाला पाठिंबा नाही.

२०१४ मध्ये काँग्रेस विरोधी आरोप भाजपने जनतेला पटवून दिले व तेच आता करण्यात विरोधी पक्ष अपयशी ठरत आहे. राजकारणामध्ये विरोधी पक्षाने रस्त्यावर उतरणे गरजेचे असते, लोकांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेणे गरजेचे असते. केवळ सोशल मीडियावर सत्ता विरोधी ट्रेंड चालवून काम होत नसते. राजकारणामध्ये रस्त्यावर उतरले तरच विरोधी पक्षाचे अस्तित्च टिकून राहते. काँग्रेसकडून हेच होताना दिसत नाही.

Loading...

Column: चाचा चौधरी आणि जाहिरातबाजी

Previous article

तेलंगणा दिवसानिम्मित पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या शुभेच्छा

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *