Royal politicsटॉप पोस्ट

Independence Day: कसा झाला तिरंगा भारताचा राष्ट्रीय ध्वज ? जाणून घ्या संपूर्ण इतिहास

0

कोणत्याही देशासाठी त्यांचा ध्वज हा खूप महत्त्वाचा असतो. का असणार नाही. शेवटी तो त्या देशाची ओळख असतो. आपण अनेक वेळा शाळेत असल्यापासून ते आजही स्वतंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तिरंग्याला अभिमानाने सलामी देतो. त्याचा सन्मान करतो. पंरतू तुम्हाला माहित आहे का  तिरंगा हा आपला राष्ट्रीय ध्वज कसा झाला ?

पहिला राष्ट्रीय ध्वज –

भारताचा पहिला राष्ट्रीय ध्वज हा 7 आॅगस्ट 1906 ला पारसी बागान चौक (ग्रीन पार्क), कलकत्ता येथे फडकवण्यात आला होता. आता कलकत्ताला कोलकाता म्हणून ओळले जातो. तो धवज लाल, पिवळा आणि हिरव्या रंगाच्या आडव्या पट्यांनी बनवला होता. त्यामध्ये कमळ, चंद्र आणि सुर्याचे चित्र होते. तसेच मध्यभागी वंदे मातरम् असे लिहिले होते.

Loading...

दुसरा ध्वज – 

दुसरा ध्वज हा 1907 ला पॅरिसमध्ये मॅडम कामा आणि त्यांच्या काही साथीदार क्रांतिकारांनी फडकवला होता, हा ध्वज सुध्दा पहिल्या ध्वजाप्रमाणेच होता. यामध्ये फक्त वरीलपट्टीमध्ये सात सप्‍तऋषि तारे होते आणि एक कमल होते.

तिसरा ध्वज – 

तिसरा ध्वज 1917 ला डाॅं. एनी बिसेंट आणि लोकमान्य टिळकांनी फडकवला. या ध्वजामध्ये 5 लाल आणि 4 हिरव्या पट्टया एका खालोखाल होत्या. तसेच सप्‍तऋषिचे सात तारे देखील होते. उजव्या साईटला वरती युनियन जैक होता. तर डाव्या साईडला वरती पांढरा अर्धचंद्र आणि तारा होता.

चौथा ध्वज – 

चौथा ध्वज 1921 ला अखिल काॅंग्रेस कमिटीच्या सत्रा वेळेस फडकवण्यात आला. हा ध्वज लाल आणि हिरव्या रंगानी बनला होता. हे रंग हिंदू आणि मुस्लिम समुदायांना दर्शवत होते. गांधींनी सांगितले होते की, भारतातील बाकी वर्गांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यामध्ये पांढऱ्या रंगाची पट्टी आणि चरखा देखील पाहिजे.

का खास हे 1931 

ध्वजांच्या इतिहासात 1931 हे वर्ष खास आहे. एक रिज्याल्यूशन पास करत तिरंग्याला राष्ट्रीय ध्वज म्हणून स्विकारण्यात आले. यामध्ये सगळ्यात वरती केसरी रंग, मध्यभागी पांढरी पट्टी आणि खाली हिरव्या रंगाची पट्टी होती. पांढऱ्या पट्टीवर चरखा होता. या धव्ज आताच्या आपल्या ध्वजासारखाच होता. फक्त यामध्ये मध्यभागी अशोक चक्राची एेवजी चरखा होता.

अखेर आताच्या तिरंग्याला मान्यता – 

त्यानंतर 22 जुलै 1947 ला आताच्या तिरंग्याला स्विकारण्यात आले. तिरंगा आंध्रप्रदेशच्या पिंगली वैंकैयाने बनवला आहे. 22 जुलैला 1947 ला कंस्टीट्यूएंट एसेंब्लीमध्ये हा तिरंगा फडकावला. हा ध्वज आधीच्या ध्वजाप्रमाणेच होता फक्त यामध्ये अशोक चक्र घेण्यात आले. व त्याचबरोबर काॅंग्रेस पार्टीचा झेंडा स्वतंत्र्य भारताचा ध्वज झाला.

हे ही वाचा – 

India’s Timeline :1947 नंतर भारतात घडलेल्या महत्त्वांच्या घटनांचा थोडक्यात आढावा

बॉलीवुड सिनेमातील असे काही डायलॉग्स, जे वाचून तुमच्यातील देशभक्ती जागृत होईल

Manto Trailer : अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढणारा एक असा लेखक, ज्याने स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानला निवडले

Pataakha Trailer – दोन बहिणींची कहानी ज्या एकमेकींचा जीव घ्यायला देखील मागे पुढे पाहत नाहीत

 

Loading...

बॉलीवुड सिनेमातील असे काही डायलॉग्स, जे वाचून तुमच्यातील देशभक्ती जागृत होईल

Previous article

1947 ला जेव्हा भारत स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत होता तेव्हा महात्मा गांधीजी का करत होते उपोषण ?

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *