मुख्य बातम्या

चिंतेत वाढ : राज्यातील ‘या’ शहरात २० दिवसांत तब्बल एक हजार कोरोनाबळी

0

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला असताना आता नागपुरातही या विषाणूचा संसर्ग अतिशय झपाट्यानं वाढू लागल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामुळं प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. सध्याच्या घडीला, नागपुरात कोरोनाबळींची संख्या दोन हजारांच्याही पलीकडे गेली आहे. नागपुरात पहिले एक हजार कोरोनाबळी १७२ दिवसांत गेले होते.
पहिल्या एक हजार कोरोनाबळींमागोमाग या विषाणूची लागण झाल्यामुळं दगावलेल्या दुसरे एक हजार कोरोनाबळी अवघ्या २० दिवसांत गेले आहेत. त्यामुळं नागपुरात कोरोनाचा विळखा आणि प्रकोप किती भयावह झाला आहे हे दिसून येत आहे.
दरम्यान रविवारी नागपुरात १ हजार २२६ नवे कोरोना पॉझिटीव्हही आढळले आहेत. ५४ जणांचा कोरोनानं बळी घेतला आहे. रविवारी या ठिकाणी ६ हजाराहूनही कमी चाचण्या करण्यात आल्या. दरम्यान, सध्या येथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६३ हजार ७५७ इतकी झाली आहे. तर, आतापर्यंत २ हजार ४४ जणांचा यात बळी गेला आहे.
महत्वाच्या बातम्या :-

कंगना सोडून आता कोरोनाकडे लक्ष द्या ; फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला
नाथाभाऊ तुमच्याकडचे ते व्हिडिओ व फोटो जनतेसमोर आणावेत – सचिन सावंत
‘त्या’ अभिनेत्रीचं नाव घ्यायची तिची लायकी नाही ; कंगनावरून गृहमंत्री संतापले
भाजपला महाराष्ट्रातल्या लोकांबद्दल कळवळा असता तर…. ; पवारांचा फडणवीसांवर निशाणा
अजित दादांच्या कामाचा दणका ; पुण्यातील मेट्रोच्या कामाची पहाटे केली पाहणी

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. चिंतेत वाढ : राज्यातील ‘या’ शहरात २० दिवसांत तब्बल एक हजार कोरोनाबळी InShorts Marathi.

शेतकरी विधेयकावरचा आक्षेप बेगडी ,कॉंग्रेस लबाडी करतंय ; फडणवीसांची जोरदार टीका

Previous article

OBC समाजानं मन मोठं केलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं – डॉ. अमोल कोल्हे

Next article

You may also like

Comments

Comments are closed.