मुख्य बातम्या

कोरोनाच्या महासंकटात शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या दारातच आणली शाळा , वाचून व्हाल हैराण

0

सध्या सगळीकडे कोरोनाचे महासंकट गडद होताना दिसत आहे. याच महासंकटाच्या काळात   कोरोनाचा  फैलाव रोखण्यासाठी मागील 5 महिन्यापासून देशातील सर्व शाळा. कॉलेजेस बंद ठेवण्यात आले आहेत. ऑनलाइन पद्धतीने जरी शाळा सुरू असली तरी  ग्रामीण भागातील मुलांपर्यंत ते शिक्षण पोहोचतच असं नाही.
छत्‍तीसगढ राज्यातील कोरिया जिल्ह्यात एक सरकारी शाळेचे शिक्षक मुलांना शिकवण्यासाठी जे प्रयत्न करीत आहेत, ते अत्यंत कौतुकास्पद आहे. सरकारी शाळेत शिकवणारे हे शिक्षक रुद्र राणा यांनी स्वतःच्या बाइकला फळा बांधून ठेवला आहे. रुद्र राणा कोरोना महासंकटामुळे जागोजागो जाऊन मोहल्ला क्लासेसच्या माध्यमातून मुलांना शिकवत आहेत.
कोरोना महासाथीमुळे शाळा बंद आहेत, शिवाय स्मार्टफोन नसल्याने अनेक विद्यार्थी ऑनलाइन क्लास अटेंड करू शकत नाही. अशात मुलांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना शिकवण्याचा विचार या रुद्र राणा यांच्या डोक्यात आला.
दरम्यान रुद्र राणा यांनी मोहल्ला क्लास सुरू केला. यात ते सोशल डिस्टन्सिंगचं पालन करतात.कोरोनाच्या काळात मुलांच्या घरासमोर येऊन हे  त्यांना शिकवतात. स्वतः सोबतच ब्लॅकबोर्ड, पुस्तकं आणि प्लेकार्डसदेखील ते घेऊन असतात. त्यांनी घंटा वाजवली की मुलं सामान्य शाळेप्रमाणे हजर होतात. विद्यार्थी सुरुवातीची प्रार्थना करतात, त्यानंतर अभ्यासक्रमानुसार क्लास सुरू केला जातो.
या क्लासेसमध्ये विविध विषयांबरोबरच त्यांना कोरोना व्हायरसबद्दलही माहिती दिली जाते. विशेष म्हणजे स्थानिकांकडून याला पाठिंबा मिळत आहे. या शिक्षकाच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडणार नाही.
महत्वाच्या बातम्या :-

काँग्रेस देशातील प्रमुख विरोधी पक्ष,जमिनीवरचे काम त्यांनी आता सुरू करायला हवे – संजय राऊत
आंदोलनावरुन संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर जोरदार टीका, म्हणतात…
.. नाहीतर मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील ; संभाजी ब्रिगेडचा गंभीर इशारा
अध्यादेश काढा अन्यथा परिणाम भोगा ; मराठा आरक्षणावरुन उदयनराजे संतापले
उद्धव ठाकरेंनी 5 मिनिटं मराठा आरक्षणावर बोलूनच दाखवावं ; चंद्रकांत पाटलांचा जोरदार हल्ला

 
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. कोरोनाच्या महासंकटात शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या दारातच आणली शाळा , वाचून व्हाल हैराण InShorts Marathi.

सारथीसह मराठा समाजाशी संबंधित योजनांचा कारभार अखेर अजितदादांकडे !

Previous article

मोठी बातमी : राज्यात मराठा आंदोलन आक्रमक होत असतानाच मुंबईमध्ये पुन्हा जमावबंदी!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.