Royal politicsटॉप पोस्ट

वाह रे बिहार बोर्ड ! विद्यार्थ्याला दिले 35 पैकी 38 मार्क

0

पटना (बिहार) – 

परीक्षेमध्ये खुलेआम काॅपी करण्यापासून ते टाॅपर घोटाळयापर्यंत अशा अनेक घटनांसाठी बिहार स्कूल एज्युकेशन बोर्ड हे नेहमीच चर्चेत असते. या वेळेस देखील विद्यार्थांच्या मार्कासंबधी घोटाळ्यामुळे बिहार बोर्ड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Loading...

टाइम्स आॅफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, 12 वीच्या जाहीर झालेल्या निकालामध्ये अनेक विद्यार्थांनी जेवढ्या मार्काची परीक्षा दिली नाही त्याही पेक्षा अधिक मार्कस त्यांना परीक्षेत मिळाले आहेत. काही विद्यार्थांना तर ज्या विषयांची परीक्षा दिली नाही त्या विषयांंमध्ये देखील मार्कस मिळाले असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

अरवल जिल्हयात राहणाऱ्या भीम कुमारने 12 वीची परीक्षा दिली होती. त्याला गणिताच्या थेअरीच्या पेपरमध्ये 35 पैकी 38 मार्क तर आॅब्जेक्टिवच्या पेपरमध्ये 35 पैकी 37 मार्कस मिळाले आहे.

टाइम्स आॅफ इंडियाशी बोलताना भीम कुमार म्हणाला की, मला या गोष्टीचे आश्चर्य वाटत नाही, कारण बिहार बोर्डामध्ये अशा गोष्टी पहिल्यापासून होत आहेत.

पुर्व चंपारण जिल्ह्यात राहणाऱ्या संदिप राजला फिजिक्स मध्ये थेअरीच्या पेपरमध्ये 35 पैकी 38 मार्क मिळाले आहेत. तर संदिपला इंग्रजी व हिंदीच्या आॅब्जेक्टिव पेपरमध्ये शून्य मार्क मिळाले आहेत.

दरभंगामध्ये देखील राहूल कुमारला गणिताच्या आॅब्जेक्टिव पेपरमध्ये 35 पैकी 40 मार्क मिळाले आहेत.

 पेपर न देताच मार्क – 

तसेच एका ठिकाणी पेपर न देताच मार्क दिल्याची घटना समोर आली आहे. वैशाली येथील जान्हवी सिंहला बायोलाॅजीच्या पेपरमध्ये 18 मार्क मिळाले आहेत; पण जान्हवी सिंहचे म्हणणे आहे की, तिने  बायोलाॅजीचा पेपरच दिला नव्हता.

बिहार बोर्डाचा 12 वीचा निकाल 6 जूनला लागला होता. या वर्षी 53 % विद्यार्थी 12 पास झाले आहेत.

याआधी बिहार बोर्डात झालेले प्रकरण- 

2016 चे टाॅपर प्रकरण

मागील वर्षी बिहार बोर्डाचा 12वीचा निकाल 65 % लागला होता व 8 लाखा पेक्षा अधिक विद्यार्थी नापास झाले होते. या वर्षी रूबी राय नावाच्या मुलीला टाॅपर म्हणून घोषित करण्यात आले होते. पण जेव्हा पत्रकारांनी त्या मुलीची मुलाखत घेतली तेव्हा तिला एकाही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही व  बिहार बोर्डाचा घोटाळा सर्वोसमोर आला. चौकशी नंतर रूबी राय टाॅपर नाही हे समोर आले . वडिलांच्या वशिल्याने ती टाॅपर झाली होती.

(RUBI RAI)

(PHOTO INPUT : – FACEBOOK)

Loading...

COLUMN: तू ही योगी, मी ही योगी

Previous article

‘क्वांटिको’मध्ये दाखवण्यात आलेल्या हिंदू दहशतवादाच्या दृश्यांबद्दल एबीसी स्टुडिओकडून माफी

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *