Royal politicsटॉप पोस्ट

तीन न्यायाधीशांच्या नियुक्ती बरोबरच सुप्रीम कोर्टाने एक नवीन रेकाॅर्ड आपल्या नावावर केला

0

केंद्रातील मोदी सरकारने सुप्रीम कोर्टात तीन नवीन जजची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये मद्रास हायकोर्टाची मुख्य न्यायाधीश इंदिरा बनर्जी, ओडिसा हायकोर्टाचे प्रमुख विनित शरण आणि उत्तराखंड हायकोर्टाचे चीफ जस्टिस केएम जोसेफ यांचा समावेश आहे. या जजच्या नियुक्ती बरोबरच सुप्रीम कोर्टाने एक वेगळाच रेकाॅर्ड आपल्या नावावर केला आहे.

जस्टिस इंदिरा बनर्जीच्या नियुक्ती बरोबरच सुप्रीम कोर्टातील महिला न्यायाधीशांची संख्या वाढली असून, ती तीन झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आतापर्यंतच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे. सुप्रीम कोर्टात जस्टिस इंदू मल्होत्रा आणि आर भानुमती आधीपासूनच काम करत आहेत. तसेच जस्टिस बनर्जी(60) सुप्रीम कोर्टातील आठव्या महिला न्यायाधीश आहेत.

Loading...

सुप्रीम कोर्टात सर्वात प्रथम महिला न्यायाधीशाची नियुक्ती 1989 मध्ये झाली होती. जस्टिस एम फातिमा बीवी या सुप्रीम कोर्टातील पहिल्या महिला न्यायाधीश होत्या.

सरकारने सुप्रीम कोर्टातील या तीन जज बरोबरच सात हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्तीचे आदेश दिले आहेत.ओडिसा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून गुजरातचे जस्टिस केएस झावेरी यांना पाठवण्यात आले आहे. पटना हायकोर्टाचे चीफ जस्टिस राजेंद्र मेनन यांना दिल्लीला नियुक्त करण्यात आले आहे. दिल्ली हायकोर्टची कार्यवाहक मुख्य न्यायाधीश गीता मित्तल यांना जम्मू-काश्मिर हायकोर्टचे चाफ जस्टिस बनवण्यात आले आहे. गुजरात हायकोर्टाचे एमआर शाह यांना पटना हायकोर्टाचे चीफ जस्टिस बनवण्यात आले आहे.

मुंबई हायकोर्टाची जस्टिस विजया कमलेश ताहिलरमानी यांना मद्रास हायकोर्टाचे चीफ जस्टिस बनवण्यात आले आहे. त्या मद्रास हायकोर्टात जस्टिस इंदिरा बनर्जी यांच्या जागा घेतील. जस्टिस ताहिलरमानी मद्रास हायकोर्टामध्ये चीफ जस्टिस बनणाऱ्या लगातार दुसऱ्या महिला आहेत.

याशिवाय केरळ हायकोर्टाचे कार्यवाहक चीफ जस्टिस ऋषीकेश रॉय यांनी त्याच कोर्टाचे मुख्य न्यायाधीश बनवण्यात आले आहे. परंतू कोलकत्ता हायकोर्टाचे जस्टिस अनिरूध्द बोस यांना झारखंडचे चीफ जस्टिस म्हणून नियुक्त करण्याची शिफारस करण्यात आली होती.

सुप्रीम कोर्टाच्या काॅलेजियमने जूलै महिन्यात या सर्व नियुक्त्यांची शिफारस केली होती.

Loading...

तुमच्या मोबाइल मध्ये झालाय का आधारचा टोल-फ्री नंबर सेव्ह? हा नंबर आहे खोटा; जाणून घ्या सत्य

Previous article

जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या घरात एका व्यक्तीने केला घुसण्याचा प्रयत्न, सुरक्षारक्षकांना संशयिताला केलं ठार

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *