Royal politicsटॉप पोस्ट

क्रिकेटर ते पंतप्रधान – जाणून घ्या पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांचा संपूर्ण प्रवास

0

माजी क्रिकेटर इम्रान खान यांनी आज पाकिस्तानचे 22 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या त्यांच्या पक्षाला निवडणूकीत 116 जागा मिळाल्या. तसेच पंतप्रधानपदाच्या निवडीसाठी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत शुक्रवारी झालेल्या मतदानात इम्रान खान यांनी १७६ मते मिळवत बहुमत सिध्द केले.

इस्लामाबाद येथे झालेल्या सोहळ्यात इम्रान खान यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.  भारताकडून या सोहळ्याला  नवज्योत सिंग सिध्दू उपस्थित होते.

Loading...

इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली 1992 ला पाकिस्तानने पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरले होते. तसेच पाकिस्तानमध्ये कॅन्सरवर उपचार करणारे पहिले हाॅस्पिटल देखील इमरान खान यांनीच सुरू केले आहे.

क्रिकेटर ते पंतप्रधान असा प्रवास – 

क्रिकेटचा प्रवास – 

(Image: Getty Images)

5 आॅक्टोंबर 1952 ला पाकिस्तानमधील लाहौर येथे त्यांचा जन्म झाला.

1971 ला इंग्लंडविरूध्द टेस्टमध्ये पदार्पण केले.

1974 ला इंग्लंडविरूध्दच वनडेमध्ये पदार्पण केले.

1982 ला इम्रान खान यांना पाकिस्तान क्रिकटेचेकॅप्टन करण्यात आले.

1987 ला त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

1988  ला पाकिस्तानचे आर्मी जनरल झिया उल हक यांच्या सांगण्यावरून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली.

1991 – इम्रान खान यांनी ‘शौखत खानम मेमोरियल’ नावाची कॅन्सरवरील रिसर्च करणारी ट्रस्ट सुरू केली. या ट्रस्टला त्यांच्या आईचे नाव देण्यात आले आहे.

1992 इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने इंग्लडला हरवत पहिल्यांदाच विश्चचषकावर नाव कोरले.

(Image: Getty Images)

1992 – इम्रान खान यांनी क्रिकेटमधून कायमची निवृत्ती घेतली.

राजकीय प्रवास –

25 एप्रिल 1996 ला तेहरिक ए इंसाफ (पीटीआय) नावाची पार्टी स्थापन केली.

10 ओक्टोंबर 2002 – पहिल्यांदाच जनरल इलेक्शन लढवत जिंकून आले.

19 नोव्हेंबर 2007 –  त्यावेळेसचे पाकिस्तानचे आर्मी जनरल परवेझ मुशरफ यांच्यावर टीका केल्याने इमरान खान यांना अटक करण्यात आली.

2008 ला इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयने भ्रष्टाचार व नवाज शरिफ यांच्यावर टीका करत निवडणूकीवर बहिष्कार टाकला.

7 मे 2013 लाहौर येथील सभेत पडल्याने इम्रान खान यांना दुखापत झाली.

11 मे 2013 च्या निवडणूकीत त्यांनी ‘नया पाकिस्तान’ची घोषणा केली. या निवडणूकीपासून त्यांचा पक्ष प्रमुख विरोधी पक्ष झाला.

जानेवारी 2015 – ब्रिटीश पत्रकार रेहम खानशी लग्न केले.

(Imran Khan -Reham Khan)

25 जून 2016 ला पंतप्रधान नवाज शरिफ यांच्यावरील पनामा पेपरप्रकरणावरील आरोपांविषयी आवाज उठवण्यास सुरूवात केली.

2 नोव्हेंबर 2016 ला पाकिस्तान मुस्लिम लीग – नवाज ( (PML-N) चे नेते हनिफ अब्बासी यांनी इम्रान खान यांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केली. इमरान खान यांच्यावर मनी लाॅंड्रिंगचे आरोप करण्यात आले.

आॅगस्ट 2017 – पीटीआयची मेंबर असलेल्या अयेशा गुलालईने इम्रान खान यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले.

15 डिसेंबर 2017 ला सुप्रीम कोर्टाने मनी लाॅंड्रिंगच्या प्रकरणातील निकाल इम्रान खान यांच्या बाजूने दिला.

18 फेब्रुवारी 2018 ला इम्रान खान यांनी तिसऱ्यांदा लग्न केले.

25 जुलै 2018 इम्रान खान यांच्या पक्षाने चौथ्यांदा सार्वत्रिक निवडणूक लढवली.

28 जुलै 2018 ला इम्रान खानचा पक्ष निवडणूकीत 116 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला.

18 आॅगस्ट 2018 ला इम्रान खान यांनी पाकिस्तानचे 22 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

(Image -fb/Imran Khan (official)

Loading...

तब्बल 350 वृत्तपत्रांनी एकाच वेळी या ‘पावरफुल’ राष्ट्रपतीच्या विरोधात उठवला आवाज

Previous article

या आहेत जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टाॅप 10 एक्ट्रेस

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *