मुख्य बातम्या

महत्वाची बातमी : फ्लॅट खरेदी करताना भरावी लागणार नाही एकही रुपयाची स्टॅम्प ड्युटी !

0

ग्राहकांना एक आनंदाची बातमी आहे. आता फ्लॅट खरेदी करताना एकही रुपयाचे मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. एकीकडे राज्य सरकारने डिसेंबर २०२० पर्यंत तीन टक्के शुल्क माफी दिली आहे. त्यानंतर आता नरेडका या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने उर्वरीत दोन टक्क्यांचा भर स्वतः उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाकाळात फ्लॅट खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी व स्थावर मालमत्ता उद्योगाला संजीवनी देण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्क पाचवरून दोन टक्क्यांवर आणले आहे. तसेच नरेडकोच्या सदस्यांकडून ३१ डिसेंबर २०२० पर्यंत फ्लॅट किंवा घर खरेदीवर एक रुपये देखील मुद्रांक शुल्क लागणार नाही.नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल ही देशभरातील निवासी बांधकाम व्यावसायिकांची संघटना आहे. या विभागात सुमारे ४५० बिल्डर्सचा समावेश आहे. सर्वाधिक बिल्डर्स मुंबईतले आहेत.
नरेडको पश्चिमचे अध्यक्ष म्हणाले की, ‘कोरोना संकटात सामना करण्याऱ्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. त्याअंतर्गत ग्राहकांना आणखी दिलासा देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे.’
महत्वाच्या बातम्या :-
मोठी बातमी : शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते म्हणून सडेतोड उत्तर देणाऱ्या संजय राऊतांची नियुक्ती !
लवकरच शालेय शिक्षणात शेती विषयाचा समावेश करणार ; मोदीसरकारचा विचार सुरू
पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांचे पंचनामे करुन तातडीने मदत द्या ; फडणवीसांची सरकारकडे मागणी
शिरुरमधील धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

इतक्या पारदर्शक बदल्या यापूर्वी कधीच झाल्या नाहीत ; शिवसेनेचा भाजपला टोला
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. महत्वाची बातमी : फ्लॅट खरेदी करताना भरावी लागणार नाही एकही रुपयाची स्टॅम्प ड्युटी ! InShorts Marathi.

रियानंतर आता कुणाचा नंबर,ठाकरे परिवार घाबरले ; किरीट सोम्मय्यांचा हल्ला

Previous article

फक्त लाख रुपयांत सुरू करा ‘हे’ पाच व्यवसाय ; महिन्याला मिळवाल २५ हजारांहून अधिक पैसे

Next article

You may also like

Comments

Comments are closed.