मुख्य बातम्या

महत्वाची बातमी : :मराठा समाजाच्या राज्यव्यापी गोलमेज परिषदेत ‘हे’ १५ ठराव मंजूर !

0

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाच्या विकासासाठी आठ सूत्री कार्यक्रम जाहीर केला आहे. तरी त्यावर मराठा समाजाचं समाधान झालेलं दिसत नाही.
मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच असल्याचा ठराव मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत आज मंजूर करण्यात आला. या परिषदेत एकूण 15 ठराव मंजूर करण्यात आले असून हे सर्व ठराव राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार असल्याचं सांगितलं.
मराठा समाज गोलमेज परिषदेतील ठराव खालीलप्रमाणे –
– मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.
– मराठा समाजातील मुलामुलींना चालू आर्थिक वर्षांपासून फी परतावा शासनाकडून मिळावा.
– केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण दिले. त्याचा लाभ मराठा समाजाला मिळावा.
– महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती द्यावी.
– सारथी संस्थेला १००० कोटींची आर्थिक तरतूद करावी.
– अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला १००० कोटींची तरतूद करावी.
– राज्यातल्या सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतिगृह तयार करावी.
– मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हा तत्काळ मागे घ्यावे.
– मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळावी.
– राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे.
– स्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी करावी ही मागणी.
– अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करावे.
– राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी.
– कोपर्डी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची अमंलबजावणी करावी.
– राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी ५०० कोटींची तरतूद करावी.
महत्वाच्या बातम्या :-

राजकीय खळबळ : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर?
शरद पवारांचा कृषी विधेयकाला विरोध नाहीच ; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
“राज्याच्या हितासाठी मोदी सरकारशी भांडायची वेळ येताच विरोधक कुठं जाऊन लपतात कळत नाही”
मला मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून कुणी थांबवू शकत नाही : संजय राऊत
महत्वाचे : राज्यातील हॉटेल सुरू करण्याबाबत आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. महत्वाची बातमी : :मराठा समाजाच्या राज्यव्यापी गोलमेज परिषदेत ‘हे’ १५ ठराव मंजूर ! InShorts Marathi.

आता तरी दार उघड भावा दार उघड ; विरोधकांची मुख्यमंत्री ठाकरेंवर सडेतोड टीका

Previous article

WHOचा धक्कादायक खुलासा ; कोरोनाला हरविण्यात लशीची गॅरेंटी नाही

Next article

You may also like

Comments

Comments are closed.