मुख्य बातम्या

ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय ; मराठा समाजाला मिळाले आरक्षणासह ‘हे’ लाभ !

0

मराठा आरक्षणासंदर्भात आज राज्याच्या मंत्रिमंडळाने विद्यमान परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, मंत्री सर्व संघटनाचे प्रतिनिधी, कायदेतज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली. सर्वांशी चर्चा करून सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्थगिती उठवावी यासाठी राज्य सरकारने अर्ज दाखल केल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली होती.
आर्थिक दुर्बल घटकांना (EWS) आरक्षणासह मिळणारे सर्व लाभ यापुढे मराठा समाजालादेखील (एसईबीसी प्रवर्ग) देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला.
हे आहेत महत्त्वाचे निर्णय :-

आर्थिक दुर्बल घटकांसाठीचे सर्व लाभ मराठा समाजाला देणार.
राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आता एसईबीसी विद्यार्थ्यांसाठी लागू करणार म्हणजे मराठा समाजाला त्याचा फायदा होईल. त्यासाठी ६०० कोटींची तरतूद.
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना पूर्वी एसईबीसी प्रवर्गासाठी लागू होती. ती तशीच आता ईडब्ल्यूएसमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांकरिता लागू. त्यासाठी ८० कोटी रुपयांची तरतूद
उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह योजनेंतर्गत शासकीय व इतर इमारती आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालविण्यास नोंदणीकृत संस्थांना देण्याची योजना गतिमान करणार.
पुण्यात मुख्यालय असलेल्या सारथी संस्थेसाठी १३० कोटींची तरतूद.
व्यावसायिकांना अर्थसाहाय्य करणाऱ्या स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे भागभांडवल ४०० कोटी रुपयांनी वाढविले.
मराठा क्रांती मोर्चामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रस्ताव येताच एक महिन्यात एसटी महामंडळात नोकरी.
मराठा क्रांती मोर्चामधील आंदोलकांवरील गुन्ह्यांची फक्त २६ प्रकरणे प्रलंबित आहेत. हे गुन्हे एक महिन्यात मागे घेणार.

महत्वाच्या बातम्या :-

.. नाहीतर मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील ; संभाजी ब्रिगेडचा गंभीर इशारा
मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताय का? भाजपा आमदाराचा सरकारला सवाल
कॉंग्रेसच्या नेत्यांना मराठा आरक्षण नको होतं ; चंद्रकांत पाटलांचा खुलासा
….नाहीतर खासदारकीचा राजीनामा देऊन राजकारणाला रामराम करणार – छत्रपती उदयनराजे
GoodNews : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार करणार महत्त्वाची घोषणा

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय ; मराठा समाजाला मिळाले आरक्षणासह ‘हे’ लाभ ! InShorts Marathi.

…तर मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करणार ; मनसेचा राज्य सरकारला कडक इशारा

Previous article

मुंबईत तुफान पावसाचं धुमशान ; आयुक्तांकडून मुंबईत सुट्टी जाहीर !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.