Royal Entertainmentमुख्य बातम्या

फोटोग्राफीत तुम्हांला आवड असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी

0

पुणे : विविध प्रकारच्या कॅमेरांद्वारे टिपली जाणारी छायाचित्रे अधिक स्पष्टपणे पाहता यावीत, यासाठी गणितीय मॉडेलच्या आधारावर नवीन तंत्रज्ञान देशात विकसित करण्यात आले आहे. आयआयटी मंडी आणि जर्मनी येथील संशोधकांनी एकत्रिपणे हा प्रयोग केला असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांसोबतच संरक्षण, सॅटेलाइट छायाचित्रे, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांसाठी या तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.
वातावरणात परावर्तित होणारा प्रकाश, तसेच कॅमेरातील तांत्रिक घटक यामुळे एखादी वस्तू, स्थळ, व्यक्तीचे फोटो काढताना त्यात स्पष्टता नसल्याचे अनेकदा पाहायला मिळते. विशेषत: संरक्षण, अंतराळ संशोधन, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांत अधिक स्पष्ट छायाचित्रांची आवश्यकता सर्वाधिक असते. मात्र, अनेकदा स्पष्टता कमी असल्याने या छायाचित्रांचा दर्जा खालावतो. तसेच, या छायाचित्रांवर आधारित लष्करी मोहिमा, वैद्यकीय निदान अथवा शस्त्रक्रिया यांच्यावर गंभीर परिणाम होतात.
हा धोका टाळण्यासाठी तसेच वापरकर्त्यांना अधिक स्पष्ट छायाचित्रांचे तंत्रज्ञान देण्यासाठी आयआयटी मंडी येथील मूलविज्ञान विभागाचे सहायक प्राध्यपक डॉ. राजेंद्र कुमार राय यांच्या नेतृत्वखाली अभ्यासकांनी गणिती मॉडेलचा आधार घेत, फोटो इमेजिंगमध्ये अधिक स्पष्टता आणण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे कोणत्याही प्रकारच्या कॅमेऱ्यांतून काढलेल्या छायाचित्रांमध्ये पडणारे डाग पूर्णपणे नाहीसे करत, छायाचित्रांचा दर्जा अधिक चांगला करण्यात संशोधकांना यश आले आहे.
अभ्यासकांकडून काही उपलब्ध कॅमेऱ्यांवर तसेच सॅटेलाइट इमेजिंग यंत्रणेवर या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या चाचणीत इतर तंत्रज्ञानाच्या तुलनेत गणितीय मॉडेलवर आधारित तंत्रज्ञानाद्वारे काढलेल्या छायाचित्रांचा दर्जा आणि स्पष्टता अधिक चांगली असल्याचा दावा डॉ. राय यांनी केला आहे. तसेच लवकरच व्यावासायिक उपयोगासाठीदेखील हे तंत्रज्ञान उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.
The post फोटोग्राफीत तुम्हांला आवड असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी appeared first on Dainik Prabhat.

थायलंडमध्ये 10 लाख फेसबुक अकाऊंट ब्लॉक

Previous article

टिक-टॉकच्या सीईओंचा राजीनामा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.