मुख्य बातम्या

शिवसेना येत नसल्यास राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन करावं ; आठवलेंची धमाकेदार ऑफर

0

“शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा काढावा आणि भाजपसोबत यावं. शिवसेना येत नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी भाजपसोबत यावं आणि सरकार स्थापन करावं,” असं मत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. त्यांनी आज अभिनेत्री पायल घोष कथित अत्याचार प्रकरणी मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवरही भाष्य केलं.
रामदास आठवले म्हणाले, “संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहेत. शिवसेनेने कॉंग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा काढून शिवसेना-भाजप-आरपीआयचं सरकार बनवावं. उद्धव ठाकरे एक वर्ष मुख्यमंत्री राहतील. उर्वरीत तीन वर्ष देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपद द्यावं. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी अस्वस्थ आहे. जर शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो. त्यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी भाजपसोबत एकत्र यावं आणि सरकार स्थापन करावं.”
महत्वाच्या बातम्या :-
राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला कोरोनाची लागण ; वरिष्ठ नेत्यांसोबत घेतली होती बैठक
मोठी बातमी : “सगळेच आरक्षण रद्द करा आणि….” ; उदयनराजेंच खळबळजनक वक्तव्य
तिजोरीत खळखळाट झाल्याने नागपूरला 500 कोटींचे विशेष अनुदान द्या ; मुख्यमंत्र्यांकडे मागणी
ड्रग्स प्रकरणाचा तपास सुरू असतानाच NCBचे प्रमुख दिल्लीला रवाना !
भाजपने बदनामी केली मग त्यांच्यासोबत परत कशाला जायचे ; राऊत-फडणवीस भेटीमुळे सेनेत नाराजीचे सूर
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. शिवसेना येत नसल्यास राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन करावं ; आठवलेंची धमाकेदार ऑफर InShorts Marathi.

शेतकरी कायदे महाराष्ट्रात लागू न करण्यावर राष्ट्रवादी,काँग्रेस ठाम ; शिवसेनेची भूमिका?

Previous article

येत्या 1 ऑक्टोबरपासून ‘या’ बदललेल्या नियमांचा थेट परिणाम आपल्या खिशावर होणार !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.