Royal EntertainmentRoyal politicsट्रेंडिंगमहाराष्ट्रमुख्य बातम्या

#MeToo : नाना पाटेकर जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करा : आठवले

0

पुणे : सध्या देशभरात उठलेल्या मीटूच्या मोहिमेबाबत रिपाइंचे नेते आणि केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ता हीने केलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या प्रकरणावर बोलताना जर नाना पाटेकर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी भुमिकाही त्यांनी यावेळी मांडली.पुण्यात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.

‘मीटू’बाबत अनेक व्यक्तींवर आरोपी केले जात आहेत. दोषींवर कारवाई झाली पाहिजे. मात्र, ज्यावेळी या घटना घडल्या त्याचवेळी तक्रार करण्याची आवश्यकता होती. केवळ एखाद्याला फसवण्यासाठी कोणीही याचा वापर करू नये. नाना पाटेकर, एम जे अकबर आणि इतर आरोप झालेले जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी. माझ्यापुरते बोलायचे झाल्यास माझा संबंध ‘मीटू’शी नाही, तर युट्यूबशी असल्याचे केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

Loading...

मध्यप्रदेशात शिवसेना विधानसभेच्या रिंगणात; जाहीर केली उमेद्वारांची यादी

Previous article

भाजपच्या वेबसाईटवर चक्क ‘पाकिस्तान जिंदाबाद’चा नारा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.