मुख्य बातम्या

“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन” , भाजप नेत्याची जीभ घसरली

0

भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय सचिव आणि माजी आमदार अनुपम हाजरा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “मला कोरोनाची लागण झाली तर मी ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन”, असं अनुपम हाजरा म्हणाले.
पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगना जिल्ह्यातील बरईपूर येथे भाजप कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांपैकी बऱ्याच जणांनी चेहऱ्यावर मास्क लावले नव्हते. या बैठकीनंतर अनुपम हाजरा यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता त्यावर उत्तर देताना हाजरा यांची जीभ घसरली.
“जर मला कोरोनाची लागण झाली तर मी ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन. कारण या संकटात त्यांनी कोरोनाबाधितांना खूप चुकीची वागणूक दिली आहे. कोरोनाबाधित मृतदेहांवर रॉकेल टाकून जाळलं आहे. अशा प्रकारची वर्तवणूक आपण कुत्रे आणि मांजरींसोबतदेखील करत नाही”, असा आरोप अनुपम हाजरा यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :-

स्थानिक प्रशासनाच्या आशिर्वादाशिवाय ड्रग्सचा पुरवठा होवू शकत नाही ; रवीना टंडनचा सूचक टोला
समाजाचे नेतृत्व कोणी करावे यापेक्षा आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा – उदयनराजे भोसले
‘होय मी… ‘ ; NCBच्या चौकशीत दीपिका पदुकोणची मोठी कबुली !
राजकारण करत असताना वरिष्ठांचं ऐकावं लागतं ; डिलिट केलेल्या ‘त्या’ ट्विटबद्दल अजित दादांचा मोठा खुलासा
प्लीज आमच्यासाठी एवढं करा ; मुख्यमंत्र्यांकडे कामगाराची ‘ही’ विनंती

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. “मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन” , भाजप नेत्याची जीभ घसरली InShorts Marathi.

केंद्र सरकार शेतकरीविरोधी काळे कायदे मागे घेईपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरूच – बाळासाहेब थोरात

Previous article

मराठवाड्यावर संकट ! ओल्या दुष्काळाबाबत लवकरच सरकार घेणार निर्णय !!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.