मुख्य बातम्या

फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर…. ; कंगनाने शिवसेनेला पुन्हा डिवचले

0

सुशांतच्या आत्महत्येनंतर कलाविश्वातील काही अनुत्तरित प्रश्न समोर आले. ज्या प्रश्नांच्या उत्तरासाठी अनेक बी- टाऊन कलाकार आग्रही असल्याचे पाहायला मिळाले. अभिनेत्री कंगना राणौत हिसुद्धा त्याच कलाकारांपैकी एक.
खुद्द कंगनाने या मुद्द्यावर काही गौप्यस्फोटही केले. इतकंच नव्हे तर, गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेसोबत सुरु असणाऱ्या संघर्षादरम्यानच आता पुन्हा एकदा मुंबईतून काढता पाय घेतलेल्या कंगनानं महाराष्ट्र शासनावर टीकेची झोड उठवली आहे.
महाराष्ट्रातील सरकार बॉलिवूडमधील ड्रग्ज माफियांना पाठिशी घालत असल्याचं म्हणत मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी करणारी कंगना आता थेट ठाकरे सरकारवर निशाणा साधताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्याच्या घडीला मुख्यमंत्रीपदाची धुरा असती तर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य मार्गानं झाला असता असा सूर तिनं ट्विच्या माध्यमातून आळवला.

I can say with utmost certainty if we had @Dev_Fadnavis as the CM of Maharashtra and not the corrupt Sonia Sena who are the mafia lovers, @MumbaiPolice would have done its job properly, public and media didn’t have to struggle to start the movement for justice #ShameOnMahaGovt https://t.co/7u5xB6REp4
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 14, 2020

Loading...

राज्यात सध्या सत्तेत असणारी भ्रष्ट सोनिया सेना जी माफियांना पाठिशी घालते, त्यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर मुंबई पोलिसांनी त्यांचं काम योग्य मार्गानं केलं असतं. नागरिक आणि जनतेला त्यांच्या न्यायासाठी संघर्ष करावा लागला नसता’, असं तिनं लिहिलं. कंगनाचं हे ट्विट पाहता आता तिला नेमकं कोण आणि काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :-

बिहार निवडणुकीत कंगना रणौत भाजपाची स्टार प्रचारक होणार? ; देवेंद्र फडणवीस म्हणतात….
उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख पडला महागात ; अब्रूनुकसानीचा कंगनाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल
कंगना सोडून आता कोरोनाकडे लक्ष द्या ; फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला
फडणवीस मुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांचा एकेरी उल्लेख खपवून घेतला नसता : जयंत पाटील
नाथाभाऊ तुमच्याकडचे ते व्हिडिओ व फोटो जनतेसमोर आणावेत – सचिन सावंत

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर…. ; कंगनाने शिवसेनेला पुन्हा डिवचले InShorts Marathi.

Loading...

मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा पद्धतशीर वापर केला जातोय – शिवसेना

Previous article

कोरोना रुग्णांचे कसे हाल होतात याचा राष्ट्रवादीच्या आमदारानं सांगितला भयंकर अनुभव !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.