Royal politicsटॉप पोस्ट

गुजरातमध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात, पायलटचा मृत्यू

0

कच्छ (गुजरात) :- 

गुजरातमधील कच्छ येथे भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहिती नुसार, या दुर्घटनेत विमानाचा पायलट संजय चौहान यांचा मृत्यू झाला. भारतीय हवाई दलाचे हे लढाऊ विमान जामनगर येथील हवाई तळावरील प्रशिक्षण देणारे विमान होते.

Loading...

अपघाताविषयी माहिती देताना हवाई दलाचे लेफ्टिंनट कर्नल मनिष ओझा यांनी सांगितले की, “सोमवारी सकाळी 10.30 वाजता पायलट एयर कंमाडर संजय चौहान यांच्या विमानाला मुदंडा येथील बेराजा गावा जवळ अपघात झाला. विमान एका मैदानी प्रदेशात पडले त्यावेळी तेथे अनेक गाया असल्याने विमानाखाली येऊन 5 गायांचा मृत्यू झाला.”

ते म्हणाले की, संजय चौहान यांना गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच अपघाताच्या कारणांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र कमिटीची स्थापना करण्यात असल्याची माहिती त्यांनी दिली.

या आधीदेखील या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात भारतीय हवाई दलाच्या माइक्रोलाइट वायरस एसडब्ल्यू 80 या हॅलिकाॅप्टरचा अपघात झाला होता. ही घटना आसामच्या मजुली बेटावर झाली होती. यावेळी हॅलिकाॅप्टरच्या पायलटने आपतकालीन स्थितीत लॅंडिग करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना त्यात यश आले नाही. या अपघातात  हॅलिकाॅप्टरचे दोन्ही पायलट विंग कमांडर जय पाल जेम्स व डी वत्स यांचा मृत्यू झाला होता.

(PHOTO INPUT :- TWITTER)

Loading...

का करत आहेत अनेक राज्यातील शेतकरी आंदोलन ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Previous article

अमित शहा घेणार उद्धव ठाकरे यांची भेट, युतीसाठी तडजोड

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *