मुख्य बातम्या

माझी पण इच्छा आहे माझ्या नावावर अशी बिल्डिंग करावी ; शरद पवारांनी कंगनाची उडवली खिल्ली

0

‘माझी पण इच्छा आहे की, माझ्या नावावर अशी कोणी बिल्डिंग करावी’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अभिनेत्री कंगना रनौत यांच्या आरोपाची गुरुवारी हसत खिल्ली उडवली. अर्थात जे कोणी बोलत आहे, त्या व्यक्तीकडून जबाबदारीने बोलण्याची अपेक्षा धरावी का? असा प्रश्नही लगेचच शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.
खारच्या फ्लॅटबाबत कंगनाने ट्वीटरद्वारे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याबाबत वक्तव्य केले होते. त्यास पवार यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले. ‘हा फक्त माझाच नाही तर संपूर्ण इमारतीचा प्रश्न होता, केवळ माझ्या फ्लॅटचा इश्यू नाही. ज्यासाठी बांधकाम व्यावसायिकाने सामोरे जाण्याची गरज आहे. ही इमारत शरद पवारांची आहे. आम्ही हा फ्लॅट त्यांच्या पार्टनरकडून खरेदी केला आहे. म्हणूनच ते यासाठी उत्तरदायी आहेत’, असे कंगनाने ट्वीटमध्ये म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या :-

शिवसेना दाऊदला घाबरते ; रामदास आठवलेंचा खळबळजनक आरोप !
कंगनाचा पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्ला ; बाळासाहेब ठाकरेंबद्दल म्हणाली…
मुंबईत येतेय कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवा ; कंगना रनौतचे खुले चॅलेंज
दहा-पंधरा वर्षांपूर्वी वर आलेले आम्हाला अक्कल शिकवायला लागलेत ; खडसेंचा फडणविसांवर हल्ला
इतक्या पारदर्शक बदल्या यापूर्वी कधीच झाल्या नाहीत ; शिवसेनेचा भाजपला टोला

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. माझी पण इच्छा आहे माझ्या नावावर अशी बिल्डिंग करावी ; शरद पवारांनी कंगनाची उडवली खिल्ली InShorts Marathi.

कंगना द्रौपदी तर उद्धव ठाकरे दुःशासन ; शहरात लागलेल्या पोस्टरवरून राजकीय महाभारत पेटले !

Previous article

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री ठाकरेंनी ठरवली रणनीती

Next article

You may also like

Comments

Comments are closed.