मुख्य बातम्या

अहमदनगरमध्ये राजकीय खळबळ ; सभापतीपदाच्या रिंगणातील भाजप नगरसेवकाचा राष्ट्रवादीत प्रवेश

0

अहमदनगर महापालिका स्थायी समितीच्या सभापती निवडीपूर्वी भाजपला धक्का बसला आहे. सभापती पदासाठी रिंगणात असणारे भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
स्थायी समिती सभापतींच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर महापालिकेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. स्थायी समितीच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता लागली असतानाच भाजपचे दावेदार मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले.
मनोज कोतकर यांच्या प्रवेशाने राजकीय भूकंप आल्याची चर्चा नगरच्या राजकारणात रंगली आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर कोतकरांनी सभापतीपदासाठी उमेदवारी अर्जही दाखल केला, त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मनोज कोतकर हे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे कट्टर समर्थक मानले जातात. कोतकरांच्या पक्षांतरामागे जगताप यांचा सहभाग असणे साहजिक मानले जाते.
महत्वाच्या बातम्या :-
मुंबईची तुंबई झाल्यावर बोंबा मारणारे नागपूर,अहमदाबाद जलमय झाल्यावर गप्प का? सेनेचा खोचक सवाल
जंबो कोविंडसेंटरमधून बेपत्ता झालेल्या लेकीसाठी माऊलीचे आमरण उपोषण
धक्कादायक : निवेदिता सराफ यांना कोरोनाची बाधा !
‘हा’ मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले एकदम कडक !
माझे घर पाडण्यापेक्षा ‘त्या’ इमारतीकडे लक्ष दिले असते तर… ; कंगनाचा पुन्हा ठाकरे सरकारवर निशाणा
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. अहमदनगरमध्ये राजकीय खळबळ ; सभापतीपदाच्या रिंगणातील भाजप नगरसेवकाचा राष्ट्रवादीत प्रवेश InShorts Marathi.

पाच वर्षे सुडाचे बळी ठरलो पण आता सुडाचे राजकारण करणार नाही : धनंजय मुंडे

Previous article

भारत बंद : शेतकरी संघटनांचे आज देशव्यापी आंदोलन !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.