मुख्य बातम्या

“राज्याच्या हितासाठी मोदी सरकारशी भांडायची वेळ येताच विरोधक कुठं जाऊन लपतात कळत नाही”

0

कोरोना पार्श्वभूमीवर अनेक राज्यांवर आर्थिक बोझा पडला आहे. यातच केंद्र सरकारकडून राज्यांना जीएसटी नुकसाई भरपाई मिळत नसल्याच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकार आणि भाजपा नेत्यांना फटकारलं आहे. राज्याच्या हितासाठी केंद्र सरकारसोबत भांडण्याची वेळ येताच विरोधक कुठं जाऊन लपतात हे कळतच नाही असा टोला त्यांनी भाजपा नेत्यांना लगावला आहे.

देशाची संघराज्य पद्धती मजबूत करणारा कायदा असं #GST कायदा करताना त्याचं वर्णन केलं गेलं. या कायद्याने राज्यांचे कर जमा करण्याचे अधिकार मर्यादित होणार असल्याने अनेक राज्यांचा त्याला तीव्र विरोध होता….. https://t.co/snYHbEEOj4
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 23, 2020

याबाबत रोहित पवार म्हणाले की, एवढ्या अडचणीतूनही मार्ग काढत राज्यात महाविकास आघाडी सरकार चांगलं काम करतंय. आज कोरोनासारख्या महामारीच्या संकटात कुठं खट्ट झालं तर त्यावरून आकांडतांडव करणारे विरोधक सरकारला साथ द्यायची तर सोडूनच द्या, पण राज्याच्या हक्काच्या पैशासाठी केंद्र सरकारला भांडण्याची वेळ येताच कुठं जाऊन लपतात, हे कळतही नाही.
उलट भाजपशासित राज्यात एखादी योजना सुरु झाल्यास त्या योजनेचं गुणगान करायला मात्र हजर होतात. पण राज्याच्या हिताचं आणि केंद्राच्या विरोधात काही बोलायचं असेल हेच नेते मौन व्रत धारण करतात, याची राज्याचा नागरिक म्हणून खंत वाटते असं त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मला मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून कुणी थांबवू शकत नाही : संजय राऊत
महत्वाचे : राज्यातील हॉटेल सुरू करण्याबाबत आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा
शरद पवारांना कोणतीही नोटीस बजावली नाही ; निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
Corona Update : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची बाधा
मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा?? विरोधकांचा ठाकरे सरकारवर निशाणा
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. “राज्याच्या हितासाठी मोदी सरकारशी भांडायची वेळ येताच विरोधक कुठं जाऊन लपतात कळत नाही” InShorts Marathi.

मला मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून कुणी थांबवू शकत नाही : संजय राऊत

Previous article

शरद पवारांचा कृषी विधेयकाला विरोध नाहीच ; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

Next article

You may also like

Comments

Comments are closed.