खेळटॉप पोस्ट

बुद्धिबळपटू सौम्या स्वामिनाथन:- “मला बुरखा घालण्यास कोणीही सक्ती करू शकत नाही.”, इराण दौर्‍यातून माघार

0

भारतीय प्रसिद्ध बुद्धिबळपटू सौम्या स्वामिनाथन ने 26 जुलै ते 4 ऑगस्ट या दरम्यान खेळवल्या जाणार्‍या इराण (हमादान) मधील आशियाई बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. या नकाराचे कारण इराण मध्ये महिलांना घालावा लागत असलेला बुरखा किंवा डोक्यावर घ्यावा लागत असणारा स्कार्फ आहे. जे तिच्या मानवीय हक्काचे उल्लंघन आहे असे ती सांगते.

काय आहे नक्की कारण-

Loading...

या बाबत ची पोस्ट फेसबूकवर शेअर करत तिने आपले मत व्यक्त केले आहे. यात ती असे म्हणते की, “मला हे सांगण्यास दु:ख होत आहे. इराण मध्ये होणार्‍या आशियाई बुद्धिबळ चॅम्पियनशिपमधून मी माघार घेत आहे. परंतु मला बुरखा घालण्यास कोणीही सक्ती करू शकत नाही.”

तिने असे देखील म्हणले आहे की, इराण मध्ये कायद्यानुसार डोक्यावर स्कार्फ किंवा बुरखा घेणे अनिवार्य आहे. आणि हे माझ्या मानवीय मूलभूत हक्कांचे, अधिकारांचे थेट उल्लंघन आहे. माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आणि माझ्या विवेक, विचाराचे, धर्म स्वातंत्र्याचे हे उल्लंघन ठरते. माझ्या मूलभूत हक्कांचे रक्षण करायचे असेल तर मी इराणला न जाणेच योग्य.

खेळामध्ये धार्मिक ड्रेस कोडची अंमलबजावणी केली जाते या बद्दल तीने निराशा व्यक्त केली.

खेळाडूंचे हक्क आणि कल्याणाकडे  चॅम्पियनशिपचे आयोजक दुर्लक्ष करीत असल्याने मी निराश आहे. मी समजू शकते की चॅम्पियनशिपमध्ये आयोजक; आम्ही आमच्या राष्ट्रीय संघाचा ड्रेस किंवा स्पोर्ट चा ड्रेस घालण्याची अपेक्षा करतात. परंतू स्पोर्ट मध्ये धार्मिक ड्रेस कोड घालण्यासाठी हे ठिकाण योग्य नाही.

“प्रत्येक वेळी भारताचे प्रतिनिधित्व करणे, राष्ट्रीय संघात माझी निवड होणे ही माझ्यासाठी खूप सन्मानची गोष्ट आहे. मला याचा खेद वाटतो की मी अशा महत्वाच्या चॅम्पियनशिप मध्ये सहभागी होणार नाही. आम्ही खेळाडू स्पोर्टसाठी बरेच जुळवून घेतो, स्पोर्ट ला जीवनात सर्वात जास्त महत्व देतो, पण काही गोष्टी आहेत त्यासाठी आम्ही तडजोड नाही करू शकतं.” असे देखील ती या पोस्ट मध्ये म्हणाली आहे.

अशा प्रकारे खेळात सहभागी न होणे हे पहिल्यांदाच घडलेले नाही. या आधी 2016 ला भारतीय नेमबाज हिना सिद्धू ने देखील आशियाई एअरगन या स्पर्धेतून याच कारणास्तव माघार घेतली होती.

भारताकडून महिला ग्रँडमास्टर चा किताब मिळालेली ही बुद्धिबळपटू पुणे (महाराष्ट्र) येथे राहते.

(PHOTO INPUT:- FACEBOOK/ SOUMYA SWAMINATHAN)

Loading...

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारास्वामी यांनी नाकारले नरेंद्र मोदी यांचे फिटनेस चॅलेंज

Previous article

आंध्रप्रदेश सरकारचा निर्णय; राज्य ‘गांजामुक्त’ करण्याचा निर्धार

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ