Royal politicsमहाराष्ट्रमुख्य बातम्या

पवारांनी केलेल्या ‘या’ मोठ्या घोषणेमुळे कॉंग्रेस-भाजप नेत्यांचा जीव भांड्यात पडला

0

पुणे : पुणे लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच होताना दिसत आहे, मध्यंतरी  ही जागा राष्ट्रवादी लढू शकते असं  विधान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. त्यावेळी ही काँग्रेस पुण्याची जागा सोडणार नसल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर सध्या दोन्ही पक्षांकडे प्रबळ उमेदवार नसल्याने खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनीच लढण्याची मागणी स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत आहे.

मुंबईमध्ये झालेल्या पक्षीय बैठकीत लोकसभा लढवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. याआधीच आपण लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे घोषित केले होते, त्यामुळे आता पुन्हा निवडणूक लढणार नसल्याचं शरद पवार यांनी सांगितले.

Loading...

दरम्यान,गेल्या दोन दिवसापासून शरद पवार हे पुण्यातून लढणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पहायला मिळाला. तर काँग्रेससह विरोधीपक्ष भाजपने देखील धसका घेतल्याचं दिसून आलं. मात्र आज पवार यांनी त्यांच्या उमेदवारीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

आगामी लोकसभेच्या निवडणुकीत पुण्यातून भाजपचाच उमेदवार निवडून येणार या आत्मविश्वासामुळे अनेक भाजपनेत्यांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. पवार यांनी केलेल्या या मोठ्या घोषणेमुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भाजप नेत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. कारण पुण्यात निर्विवाद वर्चस्व असलेल्या भाजप समोर पवारांनी जर निवडणूक लढवली असती तर मोठे आव्हान उभा राहिले असते.

शरद पवारांनी पुन्हा गायले मोदी सरकारचे गोडवे !

माढा नव्हे करमाळ्यातूनचंं आमदारकी लढवणार : संजय शिंदे

भंडारा-गोंदियाच्या विजयानंतर मोदींच्या हुकुमशाहीविरोधावर शिक्कामोर्तब – नवाब मलिक

Loading...

निवडणूक लढवणार की नाही? वाचा शरद पवारांचं उत्तर

Previous article

तटकरेंनी माघार घेतल्याने रायगडमधून भास्कर जाधव जवळपास निश्चित

Next article

You may also like

Comments

Comments are closed.