Royal politicsटॉप पोस्ट

अरे बापरे! एक मासा विकला 5 लाखाला, मासेमार झाला 20 मिनिटात मालामाल

0

म्हणतात ना नशीब सोन्याहून पिवळं असतं, त्याच हे उदाहरण … एखादा मासेमारी करणारा मासेमार फक्त काही मिनिटात कसा काय मालामाल होऊ शकतो हा प्रश्न पडतो. पण हे झालाय आणि तेही महाराष्ट्रात पालघर येथे. या मासेमाराला समुद्रात मासेमारी करताना एक मासा काय गाळाला लागतो आणि तो थेट लखपती होतो.

झालं असा की, शुक्रवारी महेश मेहर आणि भरत हे दोघे भाऊ आपली लहान नाव घेऊन समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. मासेमारी करत करत मुर्बे किनार्‍याच्या दिशेने जाता असताना त्यांना त्याचे जाळे खूपच जड झाल्यासारखे वाटले. ते पाहण्यासाठी त्यांनी जाळे जवळ घेतले आणि त्यांना त्यांच्या जाळ्यात ‘घोळ’ मासा लागल्याचे दिसले. 

घोळ मासा (मुंबई/ पालघर)
Loading...

घोळ मासा (मुंबई/ पालघर)

असा मासा जाळ्यात सापडल्याची खबर काही मिनिटात सगळीकडे पसरली, हा मासा समुद्राच्या किनार्‍यावर आणे पर्यंत व्यापार्‍यांची आणि खरेदी करण्यासाठी आलेल्याची ही काही गर्दी झाली की हा मासा विकत घेण्यासाठी अक्षरशा बोली लावावी लागली.

या माश्याचे वजन 30 किलोच्या आसपास असून तो मासा किती मोठा असू शकतो हे तुम्हीच विचार करा. सर्वात लहान घोळ माशाची किंमतही 5 ते 10  हजार रुपये असते.

घोळ माश्यावर बोली लागल्यानंतर हा मासा फक्त 20 मिनिटात 5 लाख 50 हजार रुपयाला विकला गेला. आणि हे दोघे भाऊ एका रात्रीत नाही तर काही मिनिटात लखपती झाले. मासेमारी करणार्‍यांसाठी रोजचा दिवस एकसारखा नसतो, कधी चांगली कमाई होते तर कधी काहीच नाही, पण त्या ‘घोळ’ माश्याने या मासेमारांचे झोळे काही मिनिटात लाखाने भरले.

घोळ मासा (मुंबई/ पालघर)

घोळ मासा (मुंबई/ पालघर)

याआधी भायंदरमध्येही विमियम गबरू या मासेमाराला देखील घोळ मासा सापडला होता. त्याला त्याची किंमत 5  लाख 16  हजार रुपये आली होती.

‘घोळ’ मासा नक्की आहे तरी काय?

हा मासा चवीला स्वादिष्ट असून त्यात अनेक औषधी गुणधर्म असल्याने या माश्याचे वेगळेच महत्त्व आहे. यामध्ये कोलेजन प्रमाण जास्त असल्याने अनेक औषधांमध्ये त्याचा वापर केला जातो.

कॉस्मेटिक बनवणार्‍या कंपन्या कॉस्मेटिकमध्ये या माश्यातील औषधी गुणांचा वापर करतात.

या माशाला आशिया खंडाच्या पूर्वेकडील भागात मोठी मागणी आणि  किंमत मिळते. यामुळे हा मासा  इंडोनेशिया, हाँगकाँग, सिंगापूर, मलेशिया या आशिया खंडातील पूर्व भागात निर्यात केला जातो.

हे ही वाचा- 

‘नोव्हेंबरच्या अखेर मराठा आरक्षण मिळेल, तो पर्यंत महाभरती स्थगित’- मुख्यमंत्री

 

Loading...

राज्यसभेत ‘उपसभापतीं’च्या पदासाठी भाजप आणि विरोधकांमध्ये कडा मुकाबला, निवडणूक 9 ऑगस्टला

Previous article

विरोधी पक्षाच्या राज्यसभा ‘उपसभापती’ पदाच्या उमेदवार राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण!

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *