टॉप पोस्ट

ही बातमी वाचून तुम्ही जीमेल वापरणं बंद कराल

0

जगभरातील अनेक लोकं जीमेलचा सर्रास वापर करतात. आॅफिसमध्ये, कामासाठी, वैयक्तिक कामासाठी करोडो लोकं जीमेलचा वापर करतात. एवढेच काय तर एखाद्या ठिकाणी लाॅग इन करायच असेल तरी ईमेल असणे गरजेचे असते. फेसबुक पासून ते अॅमझोन पर्यंत सर्वच ठिकाणी ईमेल सक्तीचे आहे. ईमेल जणू काही दैंनदिन कामाचा एक भागच झाला आहे.  खास करून जीमेल. ईमेलला तर भारतातील असंख्य लोकं जीमेल म्हणूनच ओळखतात. आता त्याच जीमेल बाबतची एक मोठी गोष्ट समोर आली आहे.

करोडो जीमेल धारकांचे मेल बाॅक्स हे बाहेरच्या हजारो साॅफ्टवेअर डेव्हलपर्स कडून स्कॅन करण्यात येत असल्याचा दावा वाॅल स्ट्रीट जर्नल या अमेरिकी वृत्तपत्राने केला आहे. याचाच अर्थ तिसरी व्यक्ती देखील तुमचे मेल वाचत आहे. तुम्ही कुठे लाॅग इन करता, काय खरेदी करता ही सर्व माहिती हे डेव्हलपर्स मिळवत आहेत.

Loading...

रिपोर्ट नुसार, डेव्हलपर्स कडून लोकांचे इनबाॅक्स स्कॅन करण्यात येत आहे. लोकांनी वस्तू खरेदी करण्यासाठी तसेच विविध कारणांसाठी केलेल्या लाॅग इनचाच वापर करून हे डेव्हलपर्स इनबाॅक्स स्कॅन करतात.

रिपोर्टमध्ये दोन अॅपची नावे देण्यात आली आहेत. त्यापैकी एक द रिर्टन पॅथ हे एक अॅप असून, या कपंनीच्या कामगारांनी साॅफ्टवेअर डेव्हलपर्सच्या मदतीने दोन वर्षात 8000 जणांचे मेल तपासले आहेत. तसेच दुसरे सोफ्टवेअर एडिसनने देखील हजारो लोकांचे जीमेल स्कॅन करून डाटा मिळवला आहे.

जीमेल वापरणाऱ्यांची संख्या जगभरात तब्बल 1.4 बिलियन एवढी आहे. ही संख्या बाकीच्या 25 मेल बनवणाऱ्यां कंपन्यापेक्षा (रेडिफ, याहू इ.) जास्त आहे.

या प्रकरणी गुगल कडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

Loading...

बुराडी मृत्यूकांड- 11 जणांच्या मृत्यूचे गूढ ‘डायरी’मध्ये; जाणून घ्या काय आहे हे प्रकरण

Previous article

पहा फोटो: मुंबईत पावसामुळे अंधेरीतील पूल कोसळला, मुंबईतील वाहतूक ठप्प

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *